नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

By अंकुश गुंडावार | Published: October 31, 2023 11:19 AM2023-10-31T11:19:50+5:302023-10-31T11:20:31+5:30

धोबीसराड येथील घटना : देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

A damaged truck collided with another truck, three people were killed | नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

देवरी (गोंदिया) : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रकची दुरुस्ती करीत असताना मागेहून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. यात दोन्ही ट्रकचे २ चालक व १ वाहक या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३१) पहाटे ३ वाजताच्या सुमारास गोंदिया नागपूर-रायपूर महामार्गावरील धोबीसराड येथे घडली. ट्रक चालक रोशन भीमराव सोनुने (३५) व वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे (४०) दोघे रा. टाकळी जहागीर ता. जिल्हा अमरावती, चालक अनवरखान अशरफ खान पठाण (२६) रा. वॉर्ड क्रमांक ३, पो. दूसरबीड ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा अशी या अपघातात ठार झालेल्यांची नाव आहे.

देवरी शहरालगत असलेल्या धोबीसराड राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक क्रमाकं एम.एच.३४- बी. जी.५०७४ मध्ये बिगाड आल्याने वाहन दुरुस्ती करीता महामार्गाच्या एका कडेला उभे करण्यात आले होते. या वाहनाच्या वाहन चालक व वाहकाकडून दुरुस्तीचे काम सुरू असताना मागून रायपुरकडे जाणाऱ्या दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.१६- सीडी ८७७७ ने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केलेला आहे. या घटनेचा तपास देवरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाकुचरे व पोलीस हवालदार नरेश गायधने करीत आहेत.

Web Title: A damaged truck collided with another truck, three people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.