सुरक्षेचे उपाय केले नसल्याने इमारतीवरून पडून मजूर ठार
By नरेश रहिले | Published: February 3, 2024 07:34 PM2024-02-03T19:34:56+5:302024-02-03T19:35:00+5:30
आमगाव पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी भादंविच्या कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण करीत आहेत.
गोंदिया : रिसामाच्या डी फार्म कॉलेज येथे २७ जानेवारी रोजी १२:३० वाजता इमारतीवरून सेंट्रिंगच्या पाट्या काढताना तोल गेल्याने दोन मजली इमारतीवरून पडून संतोष उरकुडा थेर (३३) रा. दागोटोला ता. सालेकसा यांचा मृत्यू झाला.
सेंट्रिंगचे काम सुरू असताना ठेकेदार शैलेश प्रेमलाल भांडारकर (३४) रा. गोंदिया रोड आमगाव याने सेंट्रिंगच्या कामावर ठेवलेल्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे इमारतीवरून पडून संतोषचा मृत्यू झाला. भूमिका संतोष थेर (३०) रा. दागोटोला यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी भादंविच्या कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण करीत आहेत.