भूमिगत गटरयोजनेच्या १२ फूट खड्ड्यात पडून मजुराचा मृत्यू

By अंकुश गुंडावार | Published: March 13, 2023 03:58 PM2023-03-13T15:58:00+5:302023-03-13T16:04:52+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवतीने भुमिगत गटार योजनेच्या काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू

A laborer fell into a 12-foot hole in an underground sewer system, died | भूमिगत गटरयोजनेच्या १२ फूट खड्ड्यात पडून मजुराचा मृत्यू

भूमिगत गटरयोजनेच्या १२ फूट खड्ड्यात पडून मजुराचा मृत्यू

googlenewsNext

गोंदिया : गोंदिया शहरात नगरपरिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांत रोष असतानाही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुले आज सोमवारी सकाळच्या सुमारास काम सुरू झाल्यानंतर सिव्हिल लाईन, मामा चौक परिसरात भूमिगत गटार योजनेच्या १२ फूट खड्ड्यातील नालीमध्ये या कामावरील एक मजूर अडकल्याने त्याला त्या ठिकाणीच अत्यव्यस्थ झाल्याची घटना आज सोमवार १३ मार्च रोजी घडली.

सदर कामगाराचे नाव सुरेश जगन नेवारे गोविंदपूर निवासी  आहे. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कामगाराला बाहेर काढण्याकरीता कसोशिने प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते इरफान सिध्दीकीसह गोंदियातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच येथील बांधकामाची तक्रार केली होती. मात्र नगरपरिषदेचे प्रशासक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी या तक्रारीं कडे कानाडोळा करीत कंत्राटदाराचा बचाव करण्याचीच भूमिका घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचे सिव्हिल लाईन, मामा चौक गोंदिया येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

सदर मजुराला १२ फुट खोल खड्ड्यात काम करायचे असून सुध्दा त्याला कोणतीही सुरक्षेची साधन पुरविली नव्हती असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी येथे येऊन जो पर्यंत मृत मजुराच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदतीची घोषणा करीत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका मृतकाचे कुटुंबीयांनी घेतली आहे.

Web Title: A laborer fell into a 12-foot hole in an underground sewer system, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.