ना रेती टाकली, ना पैसे परत केले; पाइपने मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
By नरेश रहिले | Published: February 3, 2024 07:38 PM2024-02-03T19:38:22+5:302024-02-03T19:38:42+5:30
आरोपीने दुसरी रेती न टाकता पैसे परत केले नाही. तीन वेळा पैसे मागूनही आरोपीने पैसे परत केले नाही.
गोंदिया : रेतीसाठी दिलेले पैसे परत केले नाही आणि रेतीही टाकली नाही. दिलेले पैसे परत मागितले असता लोखंडी पाइपने मारहाण केली. ही घटना गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवरगावकला येथे १ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता घडली.
गोंदिया तालुक्यातील नवरगावकला येथील मेघश्याम वसंत चौधरी (४३) याने ऑगस्ट महिन्यामध्ये घराच्या बांधकामासाठी रेतीचा टिप्पर बोलविण्याकरिता आरोपी आयुष्य खोटेले (२२) याला पैसे दिले होते. परंतु त्याने आणलेली रेती प्लास्टर करण्यास उपयुक्त नसल्याने त्यांनी ती रेती परत केली. त्यानंतर आरोपीने दुसरी रेती न टाकता पैसे परत केले नाही. तीन वेळा पैसे मागूनही आरोपीने पैसे परत केले नाही. १ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता आरोपी आयुष किशोर खोटेले (२२) याने हातात ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पाइप घेऊन आला आणि मेघश्याम बसंत चौधरी यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. मेघश्याम यांनी काठीने आयुष खोटेले यालाही मारहाण केली. या घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी दोघांवर भादंविच्या कलम ३२४, ४०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बोहरे करीत आहेत.