शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 08:01 PM2023-01-11T20:01:27+5:302023-01-11T20:03:09+5:30

Gondia News शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिस स्टेशनमध्ये शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

A teacher molested a student in a bus during an educational trip | शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Next
ठळक मुद्दे शिक्षक झाला फरारतक्रारीनंतर शिक्षकावर गुन्हा दाखल

गोंदिया : शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिस स्टेशनमध्ये शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील गोलीवार (५४) असे विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्येसुद्धा खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आमगाव तालुक्यातील एका शाळेची शैक्षणिक सहल ही स्लीपर कोच बसने पचमढी येथे गेली होती. दरम्यान, सहल पूर्ण करून परत येत असताना ४ जानेवारीला रात्री नऊ वाजताच्यानंतर बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक झोपी गेल्यावर या शिक्षकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीला बसच्या मागील सीटवर बोलाविले. त्यानंतर विज्ञान विषयाचा अभ्यास करू म्हणून तिचा विनयभंग भंग केला. सहलीवरून परत आल्यानंतर हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने तिच्या आई- वडिलांना सांगितल्यानंतर पालकांनी आमगाव पोलिस स्टेशन गाठून मंगळवारी (दि. १०) आरोपी शिक्षक सुनील गोलीवार याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (अ) भादंवि ८,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे करीत आहे.

तक्रार दाखल होताच शिक्षक फरार

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी आमगाव पोलिस स्टेशन येथे शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्याची माहिती होताच शिक्षक फरार झाला आहे. त्याचा शोध आमगाव पोलिस घेत आहेत.

 

Web Title: A teacher molested a student in a bus during an educational trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.