शिक्षिका बनून आली अन् ३० हजाराने गंडवून गेली

By नरेश रहिले | Published: October 3, 2023 03:36 PM2023-10-03T15:36:19+5:302023-10-03T15:37:29+5:30

म्हणे, कोरोनाकाळातील मिळतात पैसे: पैश्याच्या आमिषाने विधवेची केली फसवणूक

A woman calling herself a teacher cheated a widow of 30,700 | शिक्षिका बनून आली अन् ३० हजाराने गंडवून गेली

शिक्षिका बनून आली अन् ३० हजाराने गंडवून गेली

googlenewsNext

गोंदिया : शिक्षक हा समाजाला दिशा देणारा व्यक्ती म्हणून आजही पाहिले जाते. परंतु शिक्षकांच्या पवित्र पेशावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा विश्वास घात करणे सुरू झाले आहे. स्वत:ला शिक्षिका म्हणविणाऱ्या एका महिलेने त्या विधवेला तब्बल ३० हजार ७०० रूपयाचे लुटल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास सालेकसा येथील बसस्थानकावर घडली.

सालेकसा तालुक्याच्या सुकाटोला येथील सुशिला मेहतरलाल रहांगडाले (५५) ही विधवा सुनेला भेटण्यासाठी वळद येथे १ ऑक्टोबर रोजी गेली. रात्रभर मुक्काम केल्यानंतर सुनेसोबत ती आमगावला आली. तिची सून डॉकञटरकडे तपासणी करण्यासाठी गोंदियाला गेली तर आमगाववरून सालेकसा बसने सुशिला सालेकसा येथे गेली. सालेकसा बसस्थानकावर सुकाटोला येथे जाण्यासाठी बसची वाट पाहात असतांना २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सुशिला बसल्या असतांना त्यांच्या जवळी निळ्या रंगाची साडी परिधान करुन आलेली महिलेने त्यांच्यासोबत बोलचाल सुरू केली. या संभाषणात आपण पिपरीया शाळेत शिक्षिका असल्याचे सांगत तुझा मुलगा मला ओळखतो हे देखील तिने सुशिला यांना सांगितले. त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. या चर्चेत शिक्षीका बनून आलेल्या महिलेने त्यांची ३० हजार ७०० रूपयाने फसवणूक केली. या घटनेसंदर्भात सालेकसा पेालिसांनी भादंविच्या कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.

कोरोनाच्या काळातील लाभ घेण्याच्या नावावर फसवणूक

कोराेना काळातील विधवा महिलांना लाभ मिळतो यासाठी फार्म भरा असे सुशिला रहांगडाले यांना सांगितले. त्यांनी फार्म भरून द्या म्हटल्यावर फार्मचे ७०० रूपये लागत असल्याचे सांगितल्याने सुशिला यांनी ७०० रूपये दिले. परंतु एवढ्या पैश्यात होणार नाही म्हणून त्यांच्या जवळील दागिणेही घेतले. ७०० रूपये रोख व ३० हजाराचे दागिणे असा एकूण ३० हजार ७०० रूपयाचा माल पळविला.

गहान ठेवण्यासाठी गेली अन् परतलीच नाही

सुशिला रहांगडाले यांच्याकडून ७०० रूपये रोख, १५ हजाराचे सोन्याचे मनी व एक सोन्याच्या पदक किंमती १५ हजार असा ३० हजार ७०० रुपये किंमतीे दागिणे घेतले. ते दागिणे गहान ठेऊन लवरकच पैसे घेऊन येतो म्हणून गेलेली ती महिला परतलीच नाही. तिने आपली फसवणूक केल्याचे सुशिला यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.

Web Title: A woman calling herself a teacher cheated a widow of 30,700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.