नागपूर येथे जात असलेल्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू 

By अंकुश गुंडावार | Published: August 12, 2023 01:44 PM2023-08-12T13:44:18+5:302023-08-12T13:48:18+5:30

स्वर्णा जैन या आपल्या चार वर्षीय मुलाला घेवून नागपूर जाण्यासाठी तिरोडा रेल्वे स्थानकावर आल्या होत्या.

A woman on her way to Nagpur died after being hit by a train | नागपूर येथे जात असलेल्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू 

नागपूर येथे जात असलेल्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू 

googlenewsNext

तिरोडा (गोंदिया) : नागपूर येथे जात असलेल्या विवाहित महिलेचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना हावडा-मुंबई मार्गावरील तिरोडा रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.१२) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. स्वर्णा आशिष जैन (२६) असे रेल्वेने कटून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार स्वर्णा जैन या जबलपूर येथील रहिवासी असून रिवा येथील त्यांचे माहेर आहे. तिचे पती काचेवानी रेल्वे स्टेशनवर हेल्पर म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी स्वर्णा जैन या आपल्या चार वर्षीय मुलाला घेवून नागपूर जाण्यासाठी तिरोडा रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. दरम्यान तिरोडा रेल्वे स्थानकाच्या फलाटावरुन उतरुन त्या रेल्वे लाईन क्रास करीत असताना हावडाकडून येणाऱ्या गितांजली एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा रेल्वे पोलिसांनी नोंद केली आहे.

Web Title: A woman on her way to Nagpur died after being hit by a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.