कोरोनाकाळात गर्भपात घटले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:25+5:302021-07-24T04:18:25+5:30

गोंदिया : विविध कारणांनी महिलांचा गर्भपात केला जातो. गर्भामुळे आईला धोका असेल किंवा गर्भात बाळ सुरक्षीत नसेल तर डॉक्टर ...

Abortion decreased during Corona period ...! | कोरोनाकाळात गर्भपात घटले...!

कोरोनाकाळात गर्भपात घटले...!

Next

गोंदिया : विविध कारणांनी महिलांचा गर्भपात केला जातो. गर्भामुळे आईला धोका असेल किंवा गर्भात बाळ सुरक्षीत नसेल तर डॉक्टर गर्भपात करण्याचा सल्ला देतात. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात गर्भपात कमी झाले आहेत. इतर जिल्ह्यात गर्भपात वाढले असले तरी जिल्ह्यात गर्भपाताची संख्या कमी आहे. सन २०१९ मध्ये ७०० गर्भपात झाले होते. सन २०२० मध्ये ५०४ तर सन २०२१ च्या जून महिन्यापर्यंत ३०२ गर्भपात झाले आहेत.

........................................

सोनाेग्राफी व गर्भपाताची आकडेवार

सोनाेग्राफी-----सन---- ---गर्भपात

२९४१४--------२०१९------------७००

३४३३०--------२०२०-------------५०४

१९८४१--------२०२१जून अखेर---७००

..............................

प्रसूती व स्त्री रोग तज्ज्ञ

गर्भातील बाळामुळे मातेला धोका असेल किंवा बाळाची वाढ होत नसेल आणि बाळात व्यंगत्व असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच परवानगी असलेल्या गर्भपात केंद्रातच गर्भपात करता येते. लैंगिक अत्याचार प्रकरणातील अविवाहित मुलींचे गर्भपात नियमाप्रमाणे करता येते.

-डॉ. सायास केंद्रे, स्त्रीरोग तज्ज्ञ

...................

गर्भ असतांना कोरोना झाला तर

गर्भावस्थेत कोरोना झाला तर महिलांनी घाबरू नये, इतर रूग्णांप्रमाणे गर्भवती महिलेवर उपचार करता येतो. गर्भावस्थेत कोरोना झाला तर वेळेपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता असते. काही प्रमाणात गर्भपात होऊ शकतो. गर्भावस्थेत काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Abortion decreased during Corona period ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.