१५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:15 AM2018-07-04T00:15:22+5:302018-07-04T00:16:48+5:30

नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

About 482 students in 15 schools | १५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

१५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

Next
ठळक मुद्देनगर परिषद शाळांची घरघर : प्राथमिक शाळा आहेत आॅक्सीजनवर

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यावरून नगर परिषद शाळांतील विद्यार्थी पटसंख्येची घसरण कायम असल्याचे दिसते.
आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की, पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळांत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत.
या नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ४) फक्त ४८२ विद्यार्थ्यांची सध्या नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १५ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारांवर विद्यार्थी असताना पालिकेच्या १५ शाळांत ४८२ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आता हे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून ही पक्की संख्या नसून अद्याप प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असे अपेक्षीत आहे. मात्र त्यानंतरही पालिकेच्या शाळांची स्थिती खाजगी शाळांच्या तुलनेत गंभीरच राहणार आहे.
बहुतांश शाळांत पटसंख्येची घसरण
नगर परिषदेच्या बहुतांश शाळांत पटसंस्खेची घसरण मागील कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी विद्यार्थी नगर परिषदेच्या शाळा सोडून निघत असल्याने नगर परिषेला शाळा बंद करण्याची पाळी आली आहे. ही गंभीर व तेवढीच गांभीर्याने विचार करण्याजोगी बाब आहे. मात्र एवढ्यावरही नगर परिषद प्रशासन शाळांना घेऊन काही गंभीर झालेले दिसत नाही. हेच कारण आहे की, नगर परिषद शाळांना लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण काही सुटलेले नाही.
 

Web Title: About 482 students in 15 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.