९० टक्के पुरूषवर्ग व्यसनाधीन

By admin | Published: June 26, 2016 01:33 AM2016-06-26T01:33:28+5:302016-06-26T01:33:28+5:30

व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही अनेक जण कळत-नकळत त्याच्या आहारी जातात.

About 90% of the men are addicted | ९० टक्के पुरूषवर्ग व्यसनाधीन

९० टक्के पुरूषवर्ग व्यसनाधीन

Next

२७७५ लोकांना केले मुक्त : झोपडपट्टीतील बालकांनाही बोनफिक्सचे व्यसन
नरेश रहिले गोंदिया
व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही अनेक जण कळत-नकळत त्याच्या आहारी जातात. त्यातूनच अनेकांचा अपमृत्यू ओढवतो. गोंदियासारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यात दारू, गांजा, तंबाखू या अंमली पदार्थांच्या व्यसनात ९० टक्के पुरूषवर्ग डुंबून गेला आहे. यातूनच अनेक घरे उध्वस्त होत आहेत. गेल्या १६ वर्षात त्यातील २७७५ लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे.
धूम्रपान व मादक पदार्थाचे व्यसन शारीरिक, मानसिक व आर्थिक स्थिती खिळखिळी करते. गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के पुरूष कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन करीत असल्याची माहिती बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बहेकार यांनी दिली आहे.
समाजात तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, दारु, गांजा, भांग, चरस, अफीम, ब्राऊन शुगर, कोकीन, टॅबलेट, शोल्यूशन, पेट्रोल, हशीश, मारिजुआन मॉर्फिन, गर्द, एल.एस.डी., झोपेच्या गोळ्या, बेंजोडाइजेपिन, ग्लू केरोसिन, व्हाइटनगर, स्टीरॉइडस, आइडेक्स व बोनफीक्सचे व्यसन करतात. बाहेकार व्यसन मुक्ति केंद्रानुसार गोंदियात तंबाखू, बिडी,सिगारेट व खर्रा याचा उपयोग सर्रास होत आहे. जिल्ह्यात व्यसन म्हणून दारू, टॅबलेटचा उपयोग केला जात आहे. गावात छिपकली ची शेपूट, गुलेर ची बारीक कण सिगारेट मध्ये टाकून पोल्ले जाते.
मध्य प्रदेशच्या बालाघाट, लाजी येथे दारू, गांजा, वर्धा-नागपूर मध्ये ब्राऊन शुगर, दारू, भंडारात दारू, छत्तीसगडच्या रायपूर येथे दारू, गुडाखू, शोल्यूशन व पेट्रोल चा व्यसन म्हणून वापर केला जात आहे.
व्यसनमुक्ती केंद्राच्या विशेषतज्ज्ञानुसार व्यसन हे एक आजार आहे. व्यसनाच्या आहारी तरूण मंडळी जात आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक संघटना काम करीत आहेत.
बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राने सन २००० पासून आतापर्यंत २ हजार ७७५ लोकांना व्यसनमुक्त केले आहे. महिन्याकाठी १५ लोकांना व्यसनमुक्त केले जाते. या केंद्राने २००१ पासून आतापर्यंत २ हजार ७७५ लोकांना व्यसनमुक्त केले आहे.

व्यसनाच्या जनजागृतीसाठी विविध दिन
व्यसनाच्या आहारी तरूण जात आहेत. यासाठी शासनाला व्यसनमुक्त समाजासाठी विविध दिनाचे आयोजन करावे लागते. जागतिक स्तरावर व्यसनाची समस्या वाढत असल्याने ३० मार्च ला व्यसनमुक्ती संकल्प दिन, ३१ मे रोजी आंतरराष्ट्रीय धूम्रपान निषेध दिन, २६ जून अंमली पदार्थ विरोधी दिन, २ ते ८ आॅक्टोबरदरम्यान मद्य निषेध सप्ताह व १८ डिसेंबरला मद्य निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. टीव्हीवर व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाला दाखविण्यात येते. वृत्तपत्रांमधून जाहिरात देऊन जनजागृती केली जाते. तरीही व्यसन कमी होत नाही.

Web Title: About 90% of the men are addicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.