बदलत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करा

By Admin | Published: January 19, 2017 01:33 AM2017-01-19T01:33:31+5:302017-01-19T01:33:31+5:30

काळा पैसा व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व्यवहार पारदर्शकतेने करावा. यासाठी सरकारने कॅशलेस

Accept the changing economy | बदलत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करा

बदलत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करा

googlenewsNext

कॅशलेस मिशन सभा: जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचे प्रतिपादन
गोंदिया : काळा पैसा व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व्यवहार पारदर्शकतेने करावा. यासाठी सरकारने कॅशलेस व्यवहाराला सर्वोच्य प्राथमिकता दिली. कॅशलेसच्या माध्यमातून बदलत्या अर्थव्यवस्थेचा समाजाने स्विकार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी रोजी कॅशलेस गोंदिया मिशनच्या सभेत स्वेच्छेने उपस्थित युवक-युवतींना प्रमुख मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी काळे बोलत होते.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कॅशलेस गोंदियाचे प्रशिक्षक तरु ण मनूजा, दुलीचंद अनवाणी उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, बदलत्या काळानूसार पेहराव्याची पध्दत बदलत आहे. ५० वर्षानंतर याच पध्दतीमध्येही बदल झालेला दिसेल. काळानुरुप प्रत्येकाने बदलले पाहिजे. कॅशलेस व्यवहारासाठी प्रत्येकाचा मोबाईल क्रमांक हा त्याच्या बँक खात्याशी जोडला गेला पाहिजे. जिल्हयात ३५०० व्यक्तींच्या माध्यमातून प्रत्येक कुटूंबाला कॅशलेस व्यवहार करण्याचे प्रात्यिक्षक करुन दाखविले. त्यांना कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्यांनी सुधारणा केल्या त्यांना समाजाने वाईटच म्हटले हे अनेक समाजसुधारकांनी केलेल्या सुधारणावरु न दिसून येते. जिल्हयात २६ जानेवारीपर्यंत युवक वर्गाने कॅशलेस मिशनसाठी स्वत:ला झोकून देवून काम करावे, कॅशलेस व्यवहारात गोंदिया जिल्ह्याने आघाडी घेतल्यास जिल्हयाचे देशभरात नाव होईल. यासाठी प्रत्येक व्यक्तीनी कॅशलेस व्यवहाराचा मार्ग स्विकारावा. जे दुकानदार कॅशलेस व्यवहार करणार नाहीत त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूंची खरेदी करु नये, त्यांना कॅशलेस व्यवहार करण्यास बाध्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तरुण मनूजा, राजन चौबे व दुलीचंद अनवाणी यांनी उपस्थित युवक-युवतींच्या कॅशलेसबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
भीम अ‍ॅपचा उपयोग कॅशलेस व्यवहारासाठी कसा उपयुक्त आहे. याचे प्रात्याक्षिक उपस्थित युवक-युवतींसमोर मोबाईलद्वारे करुन दाखिवले. साध्या फोनवरसुध्दा कॅशलेस व्यवहार करता येत असल्याची माहिती दिली.
युपीआय हे सॉफ्टवेअर कॅशलेस मिशनमधील प्रत्येक युवक-युवतीं किमान दहा दुकानदारांना अ‍ॅक्टीवेट करुन देणार आहे. जिल्हयातील महाविद्यालयाच्या १०४८ युवक-युवतींनी कॅशलेस मिशनमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली, अशी माहिती मनूजा यांनी दिली. कॅशलेस मिशन चळवळीत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला गोंदिया शहरातील युवक-युवतींनी प्रतिसाद दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Accept the changing economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.