यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:30 PM2019-06-28T21:30:09+5:302019-06-28T21:30:26+5:30

निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आलेले कर्णधार आणि उपकर्णधार यांचा पदग्रहण सोहळा यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. चारही सदनातील विद्यार्थ्यांनी कर्णधार आणि उपकर्णधारांची निवड केली. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले, गोविंद शर्मा, दयाशंकर चितळकर आदी लाभले होते. यावेळी चारही सदनातील विजेत्यांना बॅच देऊन पदाची शपथ दिली.

Accession ceremony at Yavatmal Public School | यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आलेले कर्णधार आणि उपकर्णधार यांचा पदग्रहण सोहळा यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. चारही सदनातील विद्यार्थ्यांनी कर्णधार आणि उपकर्णधारांची निवड केली.
पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले, गोविंद शर्मा, दयाशंकर चितळकर आदी लाभले होते. यावेळी चारही सदनातील विजेत्यांना बॅच देऊन पदाची शपथ दिली.
सदनाचे कर्णधार व उपकर्णधार असे आहेत. चेतक सदन - मोहित चवरडोल, साँची भूत, गजरात सदन - इशान वारडेकर, नंदन मुंदडा, पुष्पक सदन - नयन पाटील, क्रिष्णा केळापुरे, विक्रांत सदन - प्रणव वैद्य, ओवैस सैयद. विद्यार्थी प्रमुख पदाच्या निवडणुकीत हिमांशू शर्मा हेडबॉय, तर समृद्धी राऊत हेडगर्ल ठरली. स्पोर्ट कॅप्टन शैलेश देवानी, स्पोर्ट गर्ल कॅप्टन अदिती चौधरी विजयी झाली.
ठाणेदार सचिन लुले यांनी या प्रतिनिधींना शपथ दिली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्राचार्य जेकब दास यांनी विचार मांडले. संचालन रूक्साना बॉम्बेवाला, कार्यक्रमाची रूपरेषा सीसीए प्रमुख अजय सातपुते यांनी मांडली. समन्वयक अर्चना कढव, निशा जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक प्रवीण कळसकर, सूदर्शन महिंद्रे यांनी विद्यार्थ्यांना परेडचे प्रशिक्षण दिले. विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे यांनी विद्यार्थ्यांकडून स्वागतगीताची तयारी करून घेतली. पदग्रहण सोहळ्याची मंच सजावट अभिजित भिष्म यांनी केली. आभार साक्षी नागवानी यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: Accession ceremony at Yavatmal Public School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.