मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

By अंकुश गुंडावार | Published: June 10, 2024 04:48 PM2024-06-10T16:48:49+5:302024-06-10T16:51:04+5:30

मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते.

Accident to private travel carrying laborers, one killed, 11 seriously; Incident on Gondia-Goregaon National Highway | मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात, एक ठार, ११ जण गंभीर; गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील घटना

गोरेगाव : हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील लांजी येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील मिलटोली गावाजवळ अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता घडली. थानसिंग यादव (३०, रा. रेलवाडी, जि. बालाघाट) असे मृतक मजुराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील लांजी येथून हैदराबाद जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहे. दररोज शेकडो प्रवासी या ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. दरम्यान, हैदराबाद येथे कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांची ौहैदराबाद येथे ने-आण करण्यात येते. सोमवारी सकाळी हैदराबादवरून जवळपास ५० ते ६० प्रवाशांना घेऊन लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक एमपी १३-पी ७९९९) मध्य प्रदेशातील लांजीकडे जात असताना गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर मिलटोलीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या मजुरांच्या घरावर ट्रॅव्हल्स धडकली. यात चालकाच्या कॅबिनमध्ये बसलेले १२ मजूर गंभीर जखमी झाले. दरम्यान, सर्व जखमींना गोंदिया येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना थानसिंग यादव या मजुराचा मृत्यू झाला. तर ११ गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू आहे. ६ किरकोळ जखमींना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.

हे झाले अपघातात गंभीर जखमी -
साहिल धनलाल काळसर्पे (२२), गजानन उईके (२४), अशोक काटीवाल (२१, सर्व रा. बालाघाट), गीता लटारे (३८ रा. लांजी), जयपाल गावड (३८ रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे (४० रा. परसवाडा), राजेश पुसाम (२६ रा. भजेपार), शैलेश परते (३२ रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरूराम नागपुरे (५०, रा. वारासिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तर बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व रा. नरसाळा, वारासिवनी, जि. बालाघाट, म. प्र.) किरकोळ जखमींची नावे आहेत.

मोठा अनर्थ टळला -
हैदराबादहून लांजीला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेवरील एका घरावर धडकली. यात घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा या घरात राहणारे सर्व मजूर क्वार्टरच्या बाहेर असल्याने मोठी जीवित हानी टळली.

खासगी ट्रॅव्हल्सवर नियंत्रण कुणाचे
गेल्या काही महिन्यांपासून लांजी ते हैदराबाद यादरम्यान तीन ते चार ट्रॅव्हल्स चालविण्यात येत आहेत. दररोज सायंकाळी लांजी येथून, तर हैदराबादवरून रात्री २ वाजता ट्रॅव्हल्स सोडण्यात येते. रात्रभर प्रवास केला जातो. अनेकदा चालकाला डुलकी येऊन वाहनावरील नियंत्रण सुटते व अपघात घडतात. मात्र, या प्रकाराकडे वाहतूक पोलिस व परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Accident to private travel carrying laborers, one killed, 11 seriously; Incident on Gondia-Goregaon National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.