सावलीनजीक एसटीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:14 PM2018-04-24T23:14:24+5:302018-04-24T23:14:24+5:30

गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटीला सावली-डोंगरगावनजीक अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ४-५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Accidental accidents | सावलीनजीक एसटीला अपघात

सावलीनजीक एसटीला अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटीला सावली-डोंगरगावनजीक अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ४-५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कासवगतीने या मार्गाचे बांधकाम सुरू असून सांकेत दर्शक फलकाअभावी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सविस्तर असे की, गोंदिया येथून ४० प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या गोंदिया आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८८५२ ला सावली डोंगरगाव दरम्यान असलेल्या वळणावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता अपघात झाला. बसचालकाने रस्ता बांधकाम सुरू असताना आणि समोर वळण असताना आपल्या वाहनाचा वेग कमी केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. बस वळणावर अनियंत्रित झाल्याने बस नवनिर्मीत रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. यामुळे या बसमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
आमगाव-देवरी या महामार्गावरील हरदोली ते देवरी दरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी वेळेवर दिशादर्शक फलक सुद्धा कंत्राटदार लावत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे बाांधकाम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. देवरी-हरदोली दरम्यान संपूर्ण रस्त्याचे खोदकाम पावसाळ्यापूवी झाले नाही. अनेक संकटाला नागरिक आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा एखादा वाहन समोर जात असेल व त्यांच्या मागे दुुसरे वाहन जात असेल त्यावेळी धुळीमुळे रस्ता दिसत नाही, परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर अपघात घडल्याची ओरड आहे. संबधित रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने नागरिकांना सोय होईल असे रस्त्यावर दिशादर्शक लावावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Accidental accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात