‘त्या’ प्रकरणातील आरोपीस पुन्हा अटक
By admin | Published: October 13, 2016 01:45 AM2016-10-13T01:45:55+5:302016-10-13T01:45:55+5:30
मोबाईल सीमकार्ड विक्रीच्या नावावर दुकान थाटून मुलींची अश्लिल चित्रफित बनविणाऱ्या आरोपी नौसाद हसन शेख (४६) रा.जुनी वस्ती तिरोडा याला पोलिसांनी पुन्हा अटक केली.
अश्लील चित्रफित प्रकरण : अनेक कंपन्यांची फसवणूक
तिरोडा : मोबाईल सीमकार्ड विक्रीच्या नावावर दुकान थाटून मुलींची अश्लिल चित्रफित बनविणाऱ्या आरोपी नौसाद हसन शेख (४६) रा.जुनी वस्ती तिरोडा याला पोलिसांनी पुन्हा अटक केली. त्याला पोलिसांनी कलम ४२०, ४७१, ४७३, ४७५, ४६५, ४६८ भादंवि नुसार अटक केली आहे.
आरोपीने विविध कंपनीचे हॅन्डसेट सीम वापरुन खोटे बनावट कागदपत्रे व दस्ताऐवज तयार करुन रबर स्टॅम्प खरे म्हणून बाळगून दस्ताऐवज प्रमाणित करण्याची सामुग्री कब्यात ठेवून खोटे फार्म भरुन खोटे छायाचित्र चिपकवून विविध कंपन्यांची फसवणूक केली. त्याबाबत सरकारी फिर्यादी हे सचिन टेंभुर्णीकर यांच्या रिपोर्टवरुन वरील कलमानुसार आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद आव्हाड हे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
यातील आरोपी नौसाद हसन शेख यांनी चित्रफित कुठे बनविली, कोण-कोण साथी होते. यातील अनेक मोठे मासे गळाला निश्चितच लागतील. त्यासाठी सखोल तपास होणे गरजेचे आहे अशी शहरात चर्चा आहे.या आरोपीने आपल्या दुकानात खूप युवतींना नोकरी देण्याच्या नावावर आपल्या दुकानात ठेवून घेतल्याने, व्यापारासाठी बाहेर गावी नेणे, त्यांची फसवणूक करणे असे विविध आरोप त्याच्यावर लावण्यात आले.