चोरीच्या प्रकरणातील आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०० रूपये दंड, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं सुनावली शिक्षा
By नरेश रहिले | Published: April 29, 2023 05:35 PM2023-04-29T17:35:25+5:302023-04-29T17:37:01+5:30
ही सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी २८ एप्रिल रोजी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जागेश्वर उईके यांनी केला होता.
गोंदिया : शहरातील मनोहर चौकातील सच्ची गीता पाठशाला येथील रहिवासी राधेश्याम मंगलचंद अग्रवाल यांच्या उघड्या दारामधून प्रवेश करून २ मोबाइल व रोख असा एकूण २८ हजारांचा माल चोरून नेणाऱ्या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५०० रूपये दंड ठोठावला आहे. बिरजू ऊर्फ रामकिशन तुकाराम कुंभरे (५४, रा. मुरपार (पुराडा), ता. देवरी, जि. गोंदिया) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ही सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी २८ एप्रिल रोजी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जागेश्वर उईके यांनी केला होता. खटल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता पूनम लेकरिया (अग्रवाल) यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, पोलीस शिपाई रामलाल किरसान यांनी काम पाहिले. न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजणे, गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे.