हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी चार तासात ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:00:03+5:30

तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी गावातून  अवघ्या चार तासात ताब्यात घेतले.

Accused of fleeing with trumpet in hand was arrested within four hours | हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी चार तासात ताब्यात

हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी चार तासात ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव :  १७ वर्षीय बालकाचा खंडणीसाठी खून करणारा आरोपी पोलीस कोठडीत असताना शौचालयाच्या बहाणाने पोलीस स्टेशनच्या सुरक्षा भिंतीवरून उडी घेऊन पळाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान आरोपीला आमगाव पोलिसांनी चार तासात बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी येथून अटक केली. 
दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील चेतन नरेश खोब्रागडे  या १७ वर्षाच्या बालकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (२४) रा. नवेगाव खैरलांजी, मध्यप्रदेश याला अटक केली होती. 
तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवित बालाघाट जिल्ह्यातील रजेगाव जवळील आरंभा घोटी गावातून  अवघ्या चार तासात ताब्यात घेतले. आरोपी मिळताच पोलिसांचा जीव सुद्धा भांड्यात पडला.

 गावकऱ्यांनी ठेवले आरोपीला पकडून 
- आरोपीला सध्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी पोलीस स्टेशन मधून पसार झाला होता.  आरोपी हा आपल्या बहिणीच्या गावी आरंभा घोटी येथे आपली मोटारसायकल घेण्यासाठी गेला होता. परंतू पोलिसांनी आधीच नातेवाईक व गावकऱ्यांना आरोपी पसार झाल्याची माहिती दिल्यामुळे आरोपी गावात आला असता गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वेटरचे काम करणाऱ्या दुर्गाप्रसादने का केला खून ?
- खून झालेल्या चेतनचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात अशा कुटुंबातील मुलाचे अपहरण करून १० लाख रुपयांची मागणी करून खून करणे यामागे काहीतरी वेगळे कारण असल्याची चर्चा आमगाव तालुक्यात सुरू आहे. आरोपी हा मध्यप्रदेशातील नवेगाव खैरलांजी येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून शहरातील नामांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. आमगावला भाड्याने राहत होता. या आरोपीने गरीब कुटुंबातील मुलाचा अपहरणाचा कट का रचला असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: Accused of fleeing with trumpet in hand was arrested within four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.