‘त्या’ आरोपी शिक्षकाला संस्थेने केले निलंबित
By admin | Published: July 1, 2016 01:48 AM2016-07-01T01:48:51+5:302016-07-01T01:48:51+5:30
साकोली येथील निलकमल गेस्ट हाऊसमध्ये एका मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपी शिक्षकाला निलंबीत करण्यात आल्याची माहिती जनजागृती
नवेगावबांध : साकोली येथील निलकमल गेस्ट हाऊसमध्ये एका मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपी शिक्षकाला निलंबीत करण्यात आल्याची माहिती जनजागृती शिक्षण संस्थेचे सचिव केवळराम पुस्तोडे यांनी दिली. राजू बुराडे (४२) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
देवलगाव येथील नत्थुजी पुस्तोडे आदिवासी आश्रम शाळा येथील शिक्षकाने साकोली येथील निलकमल गेस्टहाऊस येथे एका मुलीशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. सदर घटना २ जून रोजी घडली.
पिडीत मुलीने २०१२ मध्येच शाळा सोडली असून ती सध्या आपल्या गावी राहत आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ६ जून रोजी संस्थेने आरोपी शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी यांचेकडे पाठविला. सदर प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्यात आली. ७ जून रोजी राजू बुराडे याला निलंबीत करण्यात आले अशी माहिती पुस्तोडे यांनी दिली.