आरोपींनी दिली पोलिसांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:30+5:302021-09-06T04:33:30+5:30

गोंदिया : गावातील मारहाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपींनीच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

The accused threatened to implicate the police in the crime | आरोपींनी दिली पोलिसांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

आरोपींनी दिली पोलिसांना गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

Next

गोंदिया : गावातील मारहाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपींनीच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत शिवाटोलसा-तांडा येथे ३ सप्टेंबर रोजी सायंकाली ६.३० वाजेच्या सुमारासचे हे प्रकरण आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवाटोला-तांडा येथील मारहाणीच्या प्रकरणात तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुनील चैतराम गोस्वामी (बक्कल नंबर ९८५) होते. या प्रकरणात तीन आरोपींचा त्यांना तपास करावयाचा होता. मात्र, तेथे गेल्यावर आरोपींनी पोलिसांना सहकार्य न करता उलट त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. हवालदार गोस्वामी यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, १८६, १८९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Web Title: The accused threatened to implicate the police in the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.