तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:25 PM2018-11-15T22:25:13+5:302018-11-15T22:25:45+5:30

शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Action on 218 drivers in three days | तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देहेल्मेट सक्ती मोहीम : १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात दरवर्षी रस्ते अपघातात दीडशे मोटारसायकल चालकांचा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे मृत्यु होतो. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे सर्वाधिक मृत्यु होत असल्याची बाब देखील पुढे आली आहे. तर पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती मोटारसायकल देतात. त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती नसल्यामुळेच अपघातात घडतात.
दरम्यान जिल्ह्यातील अपघाताच्या घटनांचा वाढता ग्राफ कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी शहर आणि ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेदरम्यान वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व हेल्मेटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
शहरात आत्तापर्यंत शेकडो वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तर १२ नोव्हेबंरपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत तीन दिवसात २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान या कारवाईमुळे मोटारसायकल चालकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
देवरी येथे मोटारसायकल जप्त
देवरी येथे हेल्मेट सक्ती मोहीमेतंर्गत गुरूवारी (दि.१५) मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणाºया वाहन चालकाच्या ४० ते ५० मोटारसायकल जप्त करुन देवरी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आल्या. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सक्ती ठीक मात्र गुणवत्तेकडे दुर्लक्ष
जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची शिस्त लावण्यासाठी व वाढते अपघात कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू केली आहे. मोहीम योग्य असली तरी हेल्मेटच्या गुणवत्तेकडे मात्र या विभागासह वैद्यमानशास्त्र विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. विक्रेते सक्तीचा फायदा घेत आयएसआय मार्क व गुणवत्ता नसलेल्या हेल्मेटची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करीत आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर केल्यानंतरही गुणवत्ताहिन हेल्मेटमुळे एखाद्या वाहन चालकाचा मृत्यु झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाहतुकीची कोंडी कायम
वाहतूक नियंत्रण विभागाची सर्व यंत्रणा सध्या हेल्मेट सक्ती मोहीमेत व्यस्त आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले असून शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात राबविण्यात आलेला वन वे पार्किंगचा प्रयोग देखील पूर्णपणे फसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Action on 218 drivers in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.