रस्त्यावरील २२ धोकादायक वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:48 PM2018-10-27T21:48:40+5:302018-10-27T21:50:02+5:30

रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन ठेवणाऱ्या २२ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

 Action on 22 Dangerous Vehicles on the Road | रस्त्यावरील २२ धोकादायक वाहनांवर कारवाई

रस्त्यावरील २२ धोकादायक वाहनांवर कारवाई

Next
ठळक मुद्देकारवाईचा धडाका सुरूच : वाहतूक नियमांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन ठेवणाऱ्या २२ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
अर्जुनी-मोरगावच्या टी पार्इंटवर शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता दरम्यान सुर्याटोला येथील रामकृष्ण दोनोडे (४०) याने वाहन क्र.एमएच ४३ ई ३२७७ या वाहनाला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. चिचगडच्या टी पार्इंटवर सायंकाळी ६.१५ वाजता रामकृष्णने दुसरे वाहन एमएच ३५ ई ३२९६ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले.
गोरेगावच्या दुर्गा चौकात प्रवीण चंदेल रा. गोरेगाव याने एमएच ३५ १७११ या वाहनाला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. गोरेगावच्या बसस्थानकावर सहादेव साठवणे (४३) रा. सेलटॅक्स कॉलनी गोंदिया याने एमएच ३५ २९९३ या वाहनाला तर विकास सेलारे याने एमएच ३५ के १५१७ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. धापेवाडाच्या अवंती चौकात याने आपल्या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. धापेवाडा येथे परसवाडा येथील आरीफ पठाण (३४) याने एमएच ३५ ३४२८ या वाहनाला, रतनारा येथील गणेश लिल्हारे (३०) याने एमएच ३५ ए.एच.०३६७ या वाहनाला, मिथून वासनिक लोधीटोला याने एमएच ३५ २८०३ या वाहनाला, राजेंद्र सोलंकी (२५) रा. धापेवाडा याने एमएच ३५ ३४७४ या वाहनाला, मानसा येथील तुवरसिंग राठोड (४५) याने एम.पी. ०९ एफ ७२०४ या वाहनाला, आमगावच्या आंबेडकर चौकात एमएच ३५ पी ३५०८ या वाहनाला सय्यद रज्जाक (४०) याने, रमेश चौधरी (३९) रा. देवरी याने एमएच ३५ के. ४३९६ या वाहनाला, आमगावच्या बसस्थानकावर एमएच ३५ के २४७६ या वाहनाला चंद्रकांत मेहरे (२५) याने, वडेगाव येथे भगत गहाणे (३०) रा. वनमाझरी याने एमएच ३६ डी ९९८२ या वाहनाला, नवेगावबांधच्या टी पार्इंटवर पंरतू लिल्हारे (२७) रा.कटंगीकला याने एमएच ३१ पी ४५२५ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले.
भडंगा येथील देवेंद्र बावणकर (३२) याने एमएच ३५ एएच ०१३५ या वाहनाला गांधी प्रतिमा गोंदिया येथे धोकादायक स्थितीत उभे केले होते. तिरोडाच्या तिलक वॉर्डात देवानंद बावने याने एका चारचाकी वाहनाला धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले. मेंदपूरी येथील जितेंद्र चौधरी (४२) याने एमएच ४० केआर २०८४ या वाहनाला गोंदिया ते तुमसर रोड तिरोडा येथे, तिरोडाच्या डाक कार्यालयासमोर एमएच ३५ एजे ०४७४ या वाहनाला आरोपी संदीप गोसे (२१) रा. गुमाधावडा याने, तिरोडाच्या चंद्रभागा नाका तिरोडा येथे एमएच ३४ एफ ३२५६ या वाहनाला राजेश राऊत (३५) रा. इंदोरा याने,तर पिपरटोला येथील दिगेश्वर भेदे (३५) याने एमएच ३५ १३९६ या वाहनाला सालेकसा तालुक्याच्या कवडी येथे उभे करून ठेवले होते.
सदर घटनेसंदर्भात सदर आरोपीविरूध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Action on 22 Dangerous Vehicles on the Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.