आठ दिवसात ४०० वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:29 PM2018-11-01T23:29:05+5:302018-11-01T23:29:40+5:30
वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने शहरात २२ आॅक्टोबरपासून हेल्मेट सक्ती लागू केली आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
या मोहीमे अंतर्गत शहर वाहतूक नियंत्रण विभागाने ४०० वाहन चालकांवर कारवाई करुन २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी घडणाºया अपघातात दीडशे दुचाकी चालकांचा मृत्यु होतो. अपघातात मृत्युमुखी पडणाºयामध्ये बºयाच जणांचा मृत्यु हा डोक्याला गंभीर मार लागल्याने होतो.
त्यामुळे वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालून त्यातील मृतकांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी पहिल्या टप्प्यात शहरात दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. यातंर्गत २२ आॅक्टोबरपासून शहरात हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली.
२२ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण विभागाने हेल्मेटचा वापर न करणाºया ४०० वाहन चालकांवर कारवाई करुन दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला.
दरम्यान पोलीस विभागाच्या धडक कारवाईमुळे वाहन चालकांची हेल्मेट खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या मोहीमेचा काही हेल्मेट विक्रेत्यांनी सुध्दा फायदा घेतला असून रस्त्याच्या कडेला दुकान थाटून हेल्मेट विक्री करीत आहे. मात्र या हेल्मेटच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. याकडे वैद्यमापन विभागाने लक्ष देवून कारवाही करण्याची गरज आहे.
हेल्मेट सक्तीमुळे वाचले शिक्षकाचे प्राण
गोंदियावरुन एकोडी येथे जाणाºया दिलीप धुर्वे व हरिचंद्र दराडे या दोन्ही शिक्षकांच्या दुचाकीला समोरुन येणाºया दुचाकीने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या पायाला मार लागला. मात्र त्यांनी हेल्मेट परिधान केले असल्याने त्यांच्या डोक्याला कुठलीही दुखापत झाली नाही. त्यामुळे हेल्मेटमुळे सुदैवाने ते या अपघातात सुखरुप बचावले. दरम्यान हेल्मेट सक्तीमुळे आपले प्राण वाचल्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक बैजल यांचे आभार मानले.
वाहतुकीची कोंडी कायम
शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे.त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी हेल्मेट सक्ती मोहीमेत व्यस्त असल्याने त्यांचे शहरातील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.