कोरोनाला आळा घालण्यासाठी ४८ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:38+5:302021-05-03T04:23:38+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी गोंदियाचे जिल्ह्याधिकारी यांनी कोविड १९ संबंधात संचारबंदीचे आदेश दिले. परंतु त्या आदेशाचे ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी गोंदियाचे जिल्ह्याधिकारी यांनी कोविड १९ संबंधात संचारबंदीचे आदेश दिले. परंतु त्या आदेशाचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली. तसेच काहींचे वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया येथील अधिकारी व अंमलदार यांनी गोंदिया शहरात ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व लोकांची गर्दी करणाऱ्या ४८ वाहन चालकांना दंड आकारला आहे. आठ जणांचे वाहन जप्त केले आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असतांना ते विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्या या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण होऊन कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या या ४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ९ हजार २०० रूपये दंड वसूल केला आहे.