व्याघ्र प्रकल्पात मासोळ्या पकडणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: August 19, 2016 01:24 AM2016-08-19T01:24:29+5:302016-08-19T01:24:29+5:30

नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील मोगरा तलावातील मासोळ्या पकडणे मच्छीमारांना महागात पडले.

Action on fishing enthusiasts in Tiger project | व्याघ्र प्रकल्पात मासोळ्या पकडणाऱ्यांवर कारवाई

व्याघ्र प्रकल्पात मासोळ्या पकडणाऱ्यांवर कारवाई

Next

सडक-अर्जुनी : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील मोगरा तलावातील मासोळ्या पकडणे मच्छीमारांना महागात पडले. त्यांच्यावर वन्यजीव अपराधाच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय (वन्यजीव) डोंगरगाव/डेपोअंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्र कार्यालय खडकीच्या मोगरा तलावावर दि.१४ ला केशव हिरालाल शेंडे, तेजराम लहू मेश्राम रा. राजगुडा हे मासोळ्या पकडण्यासाठी गेले होेते. याबाबतची माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे कर्मचारी तलावावर पोहचले. त्या दोघांना रंगेहात पकडले. त्यात तीन किलो मासोळ्या, खेकडा व मासोळ्या पडण्याचे जाळे जप्त करण्यात आले. त्यांची जमीनावर सुटका करण्यात आली. यावेळी उपविभागीय वन अधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बागडे, क्षेत्र सहायक वक्टू अलोने, भोयर, वनरक्षक शुभम बरैय्या, संजय कटरे, कावळे, बेलेकर, सडक-अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड हे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Action on fishing enthusiasts in Tiger project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.