अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 09:53 PM2018-05-16T21:53:32+5:302018-05-16T21:53:32+5:30
जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा फायदा पोलिसांना होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडसत्र राबवून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा साठा जप्त केला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुध्द कंबर कसल्याने त्याचा फायदा पोलिसांना होत आहे.
नवेगावबांधच्या रेल्वेटोली येथील सुर्यकांता मधुकर उके (५०) यांच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया पालांदूर येथील एक अज्ञात इसम एमएच ३५ एडी ४७४० या मोटारसायकलवर १४० नग देशी दारूचे पव्वे घेवून जात होता. पोलिसांना पाहून तो पळून गेला. तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा येथील देवीबाई हदीमित्र मोटघरे (४७) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, संत सजन वॉर्ड तिरोडा येथील वनमाला भिमराव झाडे (४०) हिच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया अदासी येथील कांता राजेश्वर शेंडे (४५) या महिलेकडून पाच लिटर हातभट्टीची दारू, आसोली येथील निर्मल उद्धव मेश्राम (४९) हिच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारू, बेरडीपार येथील रविंद्र हरिराम उके (४२) यांच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. मंजू रुपचंद केवट (३३) रा. लालपहाडी मुर्री हिच्याकडून ५ लिटर, मंजू निशांत मेश्राम (३२) रा. भिमनगर हिच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारू, कुऱ्हाडी येथील हिवराज अंबिलाल उईके (४०) याच्याकडून दोन लिटर हातभट्टीची दारू, बेलटोला येथील राजकुमार धनसिंग पंधरे (४५) यांच्याकडून दहा लिटर हातभट्टीची दारू, आंबेडकर चौक कुडवा येथील सुकचंद सुरजलाल हटेवार (४८) याच्याकडून दहा लिटर देशी दारूचे पव्वे, दिनदयाल वॉर्ड रामनगर येथील देवीदास बालनदास मेश्राम (६०) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, कोटजंभुरा येथील पंचफुला गणेश बुरले (५०) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, चांदसुरज येथील सुरज जियालाल दºरो (२६) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, पातरगोटा येथील पतीराम मोहन भलावी (३५) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, माहुरकुडा येथील श्रीराम नारायण गोडपल्लीवार (५४) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, कैलास कन्हैयालाल सिंगमारे (५०) रा. आमगाव याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, खोडशिवणी येथील श्रीेराम तेजराम सुर्यवंशी (३१) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, शिशुपाल प्रकाश पटले (२३) रा. नवेगाव याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, रतनारा येथील विनोद गजानन बिजेवार (४२) याच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे जप्त केले. सदर आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.