रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:23 PM2017-11-29T22:23:47+5:302017-11-29T22:24:05+5:30

महसूल विभाागच्या भरारी पथकाने सौंदड तालुक्यातील देवपायली रेती घाटावर मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतुक करणाºया वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांच्या दंड वसूल केला.

Action on illegal transportation vehicles | रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई

रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्दे९२ हजार रुपयांचा दंड वसूल : महसूल विभागाचे धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : महसूल विभाागच्या भरारी पथकाने सौंदड तालुक्यातील देवपायली रेती घाटावर मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतुक करणाºया वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांच्या दंड वसूल केला.
प्राप्त माहितीनुसार २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता महसूल विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील देवपायली घाटात धाड टाकून सहा ट्रॅक्टर जप्त केले. त्यात वाहन मालक नितेश गुप्ता सडक अर्जुनी, नवीन महींद्रा ट्रॅक्टर, सुधाकर चांदेवार सौंदड गाडी क्रमांक एम.ए च. क्यू.जी-३६३२, सुधाकर चांदेवार चांदेवार सौंदड गाडी क्रमांक एमएच ३५-जी ४५३५, महेंद्र वंजारी सडक अर्जुनी गाडी नवीन महेंद्र ट्रॅक्टर, दिनेश कोरे मनेरी गाडी क्रमांक एमएच-३५ जी ३०३२, दिनेश कोरे मनेरी न्यू हॉलैंड या सर्व वाहनावर प्रत्येकी १५ हजार ४०० रुपये प्रमाणे एकूण ९२ हजार ८०० रुपयांचा दंड आकारला. वरील सर्व वाहन डुग्गीपार पोलीस स्थानकात जप्त करण्यात आले. काही वाहने कृषी परवान्याची असल्याची माहिती आहे. तालुक्यातील देवपायली, कोदामेडी, पळसगाव, सावंगी, ब्राम्हणी, वडेगाव, घाटबोरी, तेली अशा सात घाट २०१७ ते १८ करिता लिलाव करण्यात आले आहेत. परंतु सध्या पर्यावरणाचे ना हरकत प्रमाणपत्र महसूल विभागाला प्राप्त न झाल्याने तालुक्यातील महसूल विभागाने सध्या घाट बंद केले आहे. ही कारवाई तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अखील भारत मेश्राम, तलाठी खोखवे, तलाठी राठोड, कमळे यांनी केली.

Web Title: Action on illegal transportation vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.