दोन गटांत हाणामारी, एकाच्या खुनाचा प्रयत्न

By admin | Published: May 9, 2017 12:54 AM2017-05-09T00:54:31+5:302017-05-09T00:54:31+5:30

मामा चौकातील इजाज यांची मोटार सायकल जळाल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली.

Action in two groups, one attempt to murder | दोन गटांत हाणामारी, एकाच्या खुनाचा प्रयत्न

दोन गटांत हाणामारी, एकाच्या खुनाचा प्रयत्न

Next

२३ जणांवर गुन्हा : मोटार सायकल जळाल्यावरून झाला वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मामा चौकातील इजाज यांची मोटार सायकल जळाल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. परिणामी दोन गटातील २३ जणांवर गैरकायद्याची मंडळी तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्यामुळे ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शहराच्या मनोहर चौकातील धीरज तुळशीराम विश्वकर्मा (२२) यांना सोमवारच्या रात्री १२.३० वाजता ११ जणांनी मोटार सायकल जाळल्याचा संशय घेऊन चाकूने मारहाण केली. ते स्टेशनवर जात असताना आरोपी इजाज, जफर, राजा, तौसीफ, सोहेल, फैजल, साहील, तौसीफ लंबू व इतर तीन अशा ११ जणांनी त्यांना रस्त्यात अडवून थापड बुक्यांनी मारहाण केली. तर जफरने चाकूने मारुन खूनाचा प्रयत्न केला. सदर ११ आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४७,१४९, ३४१, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटातील १२ आरोपींनी अब्दुल सफूर गफूर (७२) रा. डोंगरतलाव छोटा गोंदिया यांच्या घरावर हल्ला करुन दोन वृद्धांना बेदम मारहाण केली. त्यांच्या घरातील विद्युत मीटर, कुलर व सायकलची तोडफोड केली. या प्रकरणात अब्दुल सकूर गफूर (७२) व मकबूल बी अब्दूल सकूर गफूर (९०) हे दोन वृद्ध गंभीर जखमी झाले.
रविवारच्या रात्री ११.४० वाजता आरोपी पप्पू टेंभरे, गणेश साखरपुडे, कमल हरिणखेडे, प्रविण हरिणखेडे, चिंटू साठवणे, सोनू, दीप वासनिक, धनीराम बिसेन, बबलू तुरकर, प्रमोद शेंडे, छोटू मेश्राम व अन्य एक या १२ जणांनी बांबू व काठ्या घेऊन त्यांच्या घरी तोडफोड केली. या संदर्भात सदर आरोपींवर भादंविच्या कलम १४३, १४७, १४६, १४९, ४५२, ३२३, ४२७, ४४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात गणेश काशिराम साखरपुडे (२३) रा. शास्त्री चौक गोंदिया, प्रविण तिमाजी हरिणखेडे (२४) रा. माता मंदिर छोटा गोंदिया, धनिराम देहाराम बिसेन (२५) रा. विठ्ठल रूख्मिणी मंदिरजवळ छोटा गोंदिया व कमल तिमाजी हरिणखेडे रा. माता मंदिरजवळ छोटा गोंदिया यांचा समावेश आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला करीत आहेत.

Web Title: Action in two groups, one attempt to murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.