गोंदियातील कुख्यात गुंड गुरू पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 12:46 PM2023-09-09T12:46:14+5:302023-09-09T12:46:54+5:30

भंडारा तुरुंगात रवानगी : आतापर्यंत विविध प्रकारचे २३ गुन्हे दाखल

Action under MPDA against notorious gangster Patle in Gondia | गोंदियातील कुख्यात गुंड गुरू पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

गोंदियातील कुख्यात गुंड गुरू पटलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

googlenewsNext

गोंदिया : गोंदियातील कुख्यात गुंड शंकर उर्फ गुरू राजाराम पटले (२५, रा. जोगलेकर वाॅर्ड, संजयनगर, गोविंदपूर, गोंदिया) याला एमपीडीए कायदांतर्गत स्थानबद्ध करण्याची कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी केली आहे. हे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.७) रोजी पारित केले असून त्यांची अंमलबजावणी शुक्रवारी (दि.८) करण्यात आली आहे.

शहर हद्दीत शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारा कुख्यात गुंड गुरू पटले याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) अंतर्गत ७ सप्टेंबर २०२३ रोजी स्थानबधद्ध आदेश जारी केले. त्याला शुक्रवारी (दि.८) आदेशाची बजावणी करून भंडारा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

समाजविघातक गुरू पटले याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा पोहोचवित होता. यावर पोलिस अधीक्षक पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने व प्रमोद मडामे यांच्यामार्फत आरोपीला स्थानबद्ध करण्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर केला होता. स्थानबद्ध प्राधिकारी चिन्मय गोतमारे यांनी गुरुवारी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची महत्वपूर्ण कार्यवाही करून त्याला भंडारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारीत केला.

मागील पाच वर्षात ११ गुन्हे

- कुख्यात गुंड गुरू पटलेवर चोरी, घरफोडी, खून, खुनासह दरोडा, दुखापत, हाताबुक्कीने मारहाण, अश्लील शिवीगाळ, गैरकायद्याची मंडळी, तडीपार प्रकरणात विनापरवानगी प्रवेश करणे, फौजदारी पात्र बलप्रयोग, शांतता भंग घडवून आणण्याचे उद्देशाने अपमान करणे, धमकी देणे, सामाईक इरादा, हत्यार बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करून आगळीक करणे या सदराखाली मागील पाच वर्षात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे २३ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

असे केले गुन्हे

पोहे दिले नाही म्हणून जयस्तंभ चौकातील पोहे विकणाऱ्याला चाकूने मारले, गुपचूप घेण्यासाठी ठेल्यावर गेला असताना मला आधी गुपचूप हवे म्हणून ग्राहकांशी वाद घालून ग्राहकांना चाकूने मारले. पोलिस दलातील जवानालाही चाकूने मारले. मित्राच्या वाढदिवसाला गेला असताना केक कापताना पुढे सरक म्हणणाऱ्या मित्रालाच चाकूने मारले. घरफोडीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना जामिनावर येताच पुन्हा गुन्हे केले आहे.

Web Title: Action under MPDA against notorious gangster Patle in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.