संघटनेच्या मजबुतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:14+5:302021-07-08T04:20:14+5:30

गोंदिया : आज देशातील सुमारे अर्धी लोकसंख्या महिलांची असून, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. अशात ...

Active participation of women is essential for strengthening the organization () | संघटनेच्या मजबुतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक ()

संघटनेच्या मजबुतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक ()

Next

गोंदिया : आज देशातील सुमारे अर्धी लोकसंख्या महिलांची असून, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. अशात भारतीय जनता पक्ष असो वा कोणत्याही संघटनेच्या मजबुतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या विधानसभा क्षेत्र बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, तालुकाध्यक्ष माधुरी हरिणखेडे, शहर अध्यक्ष निर्मला मिश्रा, संजय कुलकर्णी, मनोज मेंढे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य छाया दसरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी मागील काही वर्षांत जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हाधिकारी महिला राहिल्या आहेत. अशात महिला शक्ती भाजपशी जुळल्यास त्याचा पुढील निवडणुकांत नक्कीच फायदा मिळणार आहे. यामुळे महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी महिलांना संघटनेशी जोडण्याचे प्रयत्न करावेत, असे सांगितले. सभेला विमल नागपुरे, लक्ष्मी रहांगडाले, प्रमिला करचाल, नीता पटले, इंद्रायणी धावडे, अफसाना पठाण, मैथुला बिसेन, शिलू ठाकूर, रत्नमाला साहू, श्वेता पुरोहित, आशालता देशमुख, अनिता मेश्राम, वर्षा खरोले, मिठ्ठू पोतदार, रिता डिब्बे, मंगला वालदे, ममता सार्वे, स्वाती पवार, मनीषा पटले, सरोज ठाकूर, सानिका सोनी, शिल्पा फाहे यांच्यासह मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.

Web Title: Active participation of women is essential for strengthening the organization ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.