आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:51 PM2017-10-07T23:51:29+5:302017-10-07T23:51:40+5:30
येत्या १६ आॅक्टोबर रोजी होणाºया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या १६ आॅक्टोबर रोजी होणाºया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणूकीत सरपंच पदाची निवडणूक ही थेट मतदारातून होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणूकीत पैशाचा व दारु चा वापर होणार नाही. यादृष्टीने निवडणूक यंत्रणेने दक्ष राहावे. ही निवडणूक शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी दिले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १६ आॅक्टोबरला जिल्ह्यात होणाºया ३४७ ग्रामपंचायतीच्या सार्वित्रक निवडणूक तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते उपस्थिती होते. चन्ने म्हणाले, प्रत्येक तहसील कार्यालयात तयार करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षात येणाºया लोकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेवून कारवाई करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियंत्रण कक्षाचा नंबर हा दर्शनी भागात लावावा. त्यामुळे नागरिकांना निवडणूकीबाबतच्या तक्र ारी थेट नियंत्रण कक्षाला करता येईल. राष्ट्रीय, सामाजिक व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक यंत्रणेनी सतर्कतेने काम करावे. निवडणूक खर्चाचा हिशोब सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार हे वेळेवर सादर करतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ज्या ग्रामपंचायतीमध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे त्या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष दयावे. सरपंच व सदस्य ज्या ग्रामपंचायतीमधून बिनविरोध निवडून आले आहेत त्यामागची कारणे शोधावीत. गावपातळीवर काम करणारे स्थानिक पोलीस पाटील, कोतवालाची या कामासाठी मदत घेण्यास सांगितले.
पाच लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीमध्ये सार्वित्रक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्यामुळे ११८९ कंट्रोल युनिट व २६०९ बॅलेट युनिट उपलब्ध झाली आहे. या निवडणूकीत १०८१ मतदार केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रात २ लाख ५१ हजार ३१४ स्त्री आणि २ लाख ५१ हजार ८८६ पुरु ष असे एकूण ५ लाख ३ हजार २०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे उपजिल्हाधिकारी आंधळे यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष
ग्रामपंचायत सार्वित्रक निवडणूकीसाठी आचारसंहितेबाबत कुणाच्या काही तक्र ारी असल्यास त्यांनी जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय ०७१८२-२३०१६, टोल फ्री क्रमांक १०७७ या संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
थेट सरपंचाची निवडणूक मतदारातून होणार असल्यामुळे प्रशासन सजग राहून काम करीत आहे. कोणत्याही गावात निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने नियोजन केले आहे.
- डॉ.अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी.
...........................................
हा जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात नलक्षदृष्ट्या ५९ मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहेत तर ८८ केंद्र संवेदनशील आहेत. शांततेत व निर्भय वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ.दिलीप भूजबळ, पोलीस अधीक्षक.