कोरोना संकटकाळात प्रशासनाला अदानी फाउंडेशनची साथ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:44+5:302021-05-20T04:30:44+5:30

गोंदिया : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रुग्णांची गैरसोय होत होती. अशात ...

Adani Foundation supports administration in Corona crisis () | कोरोना संकटकाळात प्रशासनाला अदानी फाउंडेशनची साथ ()

कोरोना संकटकाळात प्रशासनाला अदानी फाउंडेशनची साथ ()

Next

गोंदिया : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रुग्णांची गैरसोय होत होती. अशात अदानी फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करीत ऑक्सिजन टँक आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी प्रत्येकी ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सीएसआर निधीतून उपलब्ध करून देत जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात देत संकटकाळात मदत केली.

कोविडच्या काळात अदानी फाउंडेशन चोवीस तास काम करीत आहे. कोविडच्या नियंत्रणाकरिता हातभार लावत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या दरम्यान गोंदिया जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेचा लवकरात लवकर अंदाज घेऊन जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या. ऑक्सिजनची उपलब्धता असणे हे प्रशासनाकरिता एक महत्त्वपूर्ण कार्य असते. त्याची जबाबदारी अदानी फाउंडेशनला सोपविण्यात आली होती. या अंतर्गत अदानी फाउंडेशनने केटीएस शासकीय रुग्णालयात १३ केएल लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज प्लांट त्वरित स्थापित करून दिला. ज्यामुळे दररोज १०००-१२०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची पूर्तता करते शक्य झाले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या प्रयत्नांनी आॉक्सिजन स्टोरेज प्लांट वेळेत कार्यान्वित करण्यास मदत झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे आणि एपीएमएलचे स्टेशन हेड कांती बिस्वास यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण काम करण्यात आले. अदानी पाॅवर महाराष्ट्र लिमिटेडने ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी एमआयडीसी गोंदियाच्या विद्यमान ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटमध्ये शिफ्टमध्ये तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. जिल्हा प्रशासन आणि अदानी फाउंडेशनच्या या वेळेवर उचलेल्या पावलांमुळे अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली. जिल्ह्यावरील ऑक्सिजन टंचाईचे संकट टाळण्यास मदत झाली.

.....

दोन्ही जिल्ह्यांना केली मदत

अदानी फाउंडेशनने कोविडच्या काळात गोंदिया जिल्ह्यात केलेल्या कामाचा प्रभाव बघता, भंडारा जिल्हा प्रशासनाने १३ केएल लिक्विड ऑक्सिजन साठवण प्लांटसाठी विनंती केली आहे. त्यासाठी अदानी फाउंडेशनने तत्काळ सहमती दर्शविली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अदानी फाउंडेशनने गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाला १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा दिले आहेत. अदानी फाउण्डेशनने संकटकाळात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

.......

गरजवंता केली मदत

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशात अदानी फाउंडेशनने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. ७६०० किराणा किट वितरित केल्या. प्रत्येक किटमध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो गव्हाचे पीठ, अर्धा लिटर तेल, एक किलो डाळ असते. ५००० मास्क वितरित, ५०० लिटर सॅनिटायझर, ४३०० हॅण्ड ग्लोव्हज, कोविड-१९ रुग्णांची तपासणी करताना लॅब तंत्रज्ञांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला १३ सीओ कोविड-१९ चाचणी कियोस्क वाटप केले.

Web Title: Adani Foundation supports administration in Corona crisis ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.