लोधी समाजाला मागासवर्गीय यादीत समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:23 PM2019-04-24T21:23:43+5:302019-04-24T21:24:12+5:30

लोधी समाज हा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. राज्यात लोधी समाज इतर मागासवर्गात मोडतो. पण केंद्रात लोधी समाजाचे इतरमागास वर्गाच्या यादीत नाव नाही. त्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना केंद्राच्या नोकरीस मुकावे लागते. तरी महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या इतरमागासवर्गाच्या सूचीमध्ये समाविष्ट करावे असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी व्यक्त केले.

Add Lodhi community to backward class list | लोधी समाजाला मागासवर्गीय यादीत समाविष्ट करा

लोधी समाजाला मागासवर्गीय यादीत समाविष्ट करा

googlenewsNext
ठळक मुद्देभेरसिंह नागपुरे : आमगाव येथील लोधी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : लोधी समाज हा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहे. राज्यात लोधी समाज इतर मागासवर्गात मोडतो. पण केंद्रात लोधी समाजाचे इतरमागास वर्गाच्या यादीत नाव नाही. त्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना केंद्राच्या नोकरीस मुकावे लागते. तरी महाराष्ट्रातील लोधी समाजाला केंद्राच्या इतरमागासवर्गाच्या सूचीमध्ये समाविष्ट करावे असे प्रतिपादन माजी आमदार भेरसिंह नागपुरे यांनी व्यक्त केले.
लोधी समाज सेवा समितीच्यावतीने येथे रविवारी (दि.२१) आयोजित लोधी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ््यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन लांजीचे आमदार भागवत नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. दीप प्रज्वलन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी आमदार संजय पुराम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, नायब तहसीलदार शौकन नागपुरे, लोधी जन आंदोलन संयोजक राजीव ठकरेले, जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे, माजी सभापती यादनलाल बनोटे, माजी सभापती खेमराज लिल्हारे, लोधी शक्ती संघटन प्रमुख अ‍ॅड. येशुलाल उपराडे, माजी सभापती बाबुलाल उपराडे, पोलीस उपनिरीक्षक अमर बसेना, सामाजिक कार्यकर्ता कुवरलाल मच्छिरके, लोधी समाज रायपूरचे अध्यक्ष सुरेश सुलाखे, सचिव प्रल्हाद दमाहे, जतन दमाहे, सुनील लिल्हारे, नंदकिशोर बिरनवार, निरज नागपुरे, रामेश्वर लिल्हारे, ज्ञानीराम मच्छिरके, विवेक मस्करे, अरुणकुमार चंदेह, सुभाष रामरामे, वाय.सी. भोपट उपस्थित होते.
प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष प्रा. जागेश्वर लिल्हारे यांनी मांडले. संचालन कवि हेमंत मोहारे व नूतन दमाहे यांनी केले. आभार समितीचे उपाध्यक्ष रोशन लिल्हारे यांनी मानले. विवाह सोहळ्यासाठी समितीचे सचिव रोशन गराडे, सहसचिव केवलचंद मच्छिरके, कोषाध्यक्ष युवराज बसोने, सहकोषाध्यक्ष ओमकार लिल्हारे, संयोजक देवेंद्र मच्छिरके, शंकर नागपुरे, सेवक बनोठे, प्रेमचंद दशरीया, नरेंद्र लिल्हारे, लक्ष्मण नागपुरे, डॉ. रामचंद लिल्हारे, कृष्णकुमार गयगये, तोषलाल लिल्हारे, संतोष नागपुरे, जयेश लिल्हारे, सुखवंता बनोठे, पुष्पा ढेकवार, दिपीका मच्छिरके, प्रिती लिल्हारे, दुर्गेश्वरी दमाहे, बद्रीप्रसाद दशरीया, ज्ञानीराम बनोठे, अशोक नागपुरे, नवयुवक लोधी समाज परिचय संमेलन गोंदिया, लोधी शक्ती संघटन आमगाव, चंगोराभाटा लोधी समाज रायपूर, उत्कर्ष लोधी समाज पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या विवाह सोहळ््यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्लीसह अन्य राज्यातील स्वजातीय बांधव उपस्थित होते.

आठ जोडप्यांचे लावले लग्न
या विवाह सोहळ््यात आठ जोडप्यांचे लोधी समाज रितीरिवाजाप्रमाणे हिंदू पद्धतीने लग्न लावण्यात आले. त्या आठ जोडप्यांना पाच उपयोगी भांडे देण्यात आले. तसेच मागीलवर्षी सामूहिक विवाह सोहळ््यात परिणयबद्ध झालेल्या वर-वधू तसेच त्यांच्या आई-वडिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच सामूहिक विवाहात सोहळ््यात लोधी क्षत्रिय समाजाच्यावतीने (चगोराभाठा-रायपूर) जोडप्यांना स्मृतिचिन्ह रुपात लोधेश्वर धाम शीर्षक रुपात भेट देण्यात आले.

Web Title: Add Lodhi community to backward class list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.