नवीन लोकांना पक्षाशी जोडा

By admin | Published: January 6, 2016 02:09 AM2016-01-06T02:09:14+5:302016-01-06T02:09:14+5:30

ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले त्या भागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करा ...

Add new people to the party | नवीन लोकांना पक्षाशी जोडा

नवीन लोकांना पक्षाशी जोडा

Next

राजेंद्र जैन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आवाहन
गोंदिया : ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले त्या भागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करा आणि नवीन लोकांना पक्षाशी जोडून संघटन मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह सडक-अर्जुनी व देवरी येथील नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्षांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून त्याचा विस्तार करण्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला प्रामुख्याने माजी आ.दिलीप बन्सोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.पक्षनेता गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, भंडारा जिल्हा अर्बन को-आॅप. बँकेचे अध्यक्ष महेश जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक गुप्ता, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष बबलू कटरे, देवरी कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम, तिरोडा पं.स.सभापती उषा किंदरले, सडक अर्जुनी कृउबा समितीचे सभापती डॉ.अविनाश काशीवार, जिल्हा युवक राकाँ अध्यक्ष किशोर तरोणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्ष सुमन बिसेन, रिता लांजेवार तथा कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम व डॉ.अविनाश काशीवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पक्षाची जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिण्यांचे नव्याने गठन करण्याबद्दलही यावेळी आ.जैन यांनी सूचविले. या बैठकीला जि.प.सदस्य कुंदन कटारे, दुर्गाबाई तिराले, सुखराम फुंडे, रमेश चुऱ्हे, केतन तुरकर, कैशाल पटले, ललिता चौरागडे, नामदेव डोंगरवार, राजेश भक्तवर्ती, देवरी न.पं. अध्यक्ष सुमन छोटेलाल बिसेन, सडक अर्जुनी न.पं.अध्यक्ष रिता लांजेवार, तिरोडा पं.स.उपसभापती डॉ.किशोर पारधी, वीणा पंचम बिसेन, सुरेश हर्षे आदी अनेक जण उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Add new people to the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.