आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:04+5:302021-04-11T04:28:04+5:30

गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. विशेष म्हणजे आता शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव ...

Added 3 more containment zones | आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविले

आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविले

Next

गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे. विशेष म्हणजे आता शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येत असून हेच कारण आहे की, जिल्ह्यात शनिवारी (दि.१०) आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविण्यात आले आहेत. यामध्ये आमगाव तालुक्यातील २, तर सालेकसा तालुक्यातील १ कंटेनमेंट झोन आहे.

जिल्ह्यात सध्या दररोजची बाधितांची संख्या ६०० वर जात आहे. यामुळे क्रियाशील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद्भवू नये, यासाठी आता कंटेनमेंट झोन तयार केले जात आहेत. शुक्रवारी (दि.९) जिल्ह्यात एकूण २० कंटेनमेंट झोन होते. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात आता वाढ करावी लागत असल्याचे दिसत आहे. त्यानुसार, शनिवारी (दि.१०) जिल्ह्यात आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविण्यात आले होते. यामध्ये आमगाव तालुक्यातील रिसामा येथे कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले असून तेथे ८ तर बनगाव येथे २२ बाधित आहेत. तसेच सालेकसा तालुक्यातील सातगाव येथे कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले असून तेथे १८ बाधित आहेत. विशेष म्हणजे, या कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीच काही भाग कंटेनमेंट झोनमध्ये आहे.

------------------------------

बनगाव व साखरीटोलाची स्थिती गंभीर

शनिवारी बनगाव व सातगाव येथे कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. मात्र, विशेष म्हणजे, आमगाव तालुक्यातील बनगाव येथील वॉर्ड क्रमांक ६ व २ अगोदरच कंटेनमेंट झोनमध्ये आहे. यात वॉर्ड क्रमांक- ६ मध्ये ११, तर वॉर्ड क्रमांक- २ मध्ये १० बाधित आहेत. त्यात आता आणखी २२ बाधितांची भर पडल्याने आणखी एक कंटेनमेंट झोन वाढविण्यात आला आहे. तसेच साखरीटोला येथील वॉर्ड क्रमांक- १ आणि २ ही कंटेनमेंट झोनमध्ये असून तेथे १३ बाधित आहेत. त्यात आता सातगाव येथे कंटेनमेंट झोन करण्यात आले असून तेथे १८ बाधित आहेत. साखरीटोला व सातगाव हे लागूनच आहेत. यामुळे बनगाव व साखरीटोलाची स्थिती गंभीर होताना दिसत आहे.

-----------------------------

आता झाले एकूण २३ कंटेनमेंट झोन

शुक्रवारच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २० कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक ८ कंटेनमेंट झोन गोंदिया शहरातील होते. मात्र, कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला असून बाधितांमध्ये दिवसेंदिवस भर घालत असल्याने आता कंटेनमेंट झोनमध्येही वाढ करावी लागत आहे. यामुळेच शनिवारी आणखी ३ कंटेनमेंट झोन वाढविण्यात आले आहेत.

Web Title: Added 3 more containment zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.