दररोज बदलणार अतिरिक्त केंद्र संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:25 AM2018-02-28T00:25:36+5:302018-02-28T00:25:36+5:30

येत्या १ मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

Additional Center Director to change every day | दररोज बदलणार अतिरिक्त केंद्र संचालक

दररोज बदलणार अतिरिक्त केंद्र संचालक

Next
ठळक मुद्देदहावी बोर्डाची परीक्षा १ मार्चपासून : जिल्ह्यातील २० हजारावर विद्यार्थी देणार परीक्षा

ऑनलाईन लोकमत
सालेकसा : येत्या १ मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. यंदा बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक परीक्षा केंद्रावर दररोज अतिरिक्त केंद्र संचालक बदलणार आहे. तर अंतर्गत केंद्र संचालकाच्या देखरेखीत वर्गातील पर्यवेक्षकाला आधीपेक्षा तिप्पट जवाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. यात एकीकडे अतिरिक्त केंद्र संचालकाला काही जबाबदाऱ्यांपासून सुट दिली असली तरी प्रश्न पत्रिका व उत्तरपत्रिका वेळेवर पोहचविणे आणि त्यांचा हिशोब देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
दुसरीकडे तीन तासांचा पेपर पूर्ण होईपर्यंत प्रश्न पत्रिकेचा हिशोब वर्ग पर्यवेक्षाकडे राहील. त्यामुळे आता पर्यवेक्षकाचे काम करणे थोडे जिकरीचे ठरणार आहे. आतापर्यंत दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत एक केंद्र संचालक आणि एक अतिरिक्त केंद्र संचालक अशाप्रकारे दोन केंद्र संचालक पूर्ण परीक्षा संपेपर्यंत नियुक्त केले जात होते. केंद्र संचालक हा ज्या शाळेत परीक्षा केंद्र दिले आहे त्या शाळेचा राहयचा. त्याच्याकडे दिलेल्या कामामध्ये केंद्रावर आवश्यक सर्व भौतिक सोयी सुविधा पुरविणे बैठक व्यवस्था, वीज, पंखे, पाणी व इतर सुविधा विद्यार्थ्यांना करुन देणे, संपूर्ण परीक्षा सुरळीत घेणे, पर्यवेक्षक नियुक्त करने यासह परीक्षा केंद्रावरची सर्वच जवाबदारी केंद्र संचालकाकडे आहे. अतिरिक्त केंद्र संचालकांची नियुक्ती इतर शाळेतील शिक्षकांपैकी वरिष्ठ शिक्षकांमधून करुन त्यांच्याकडे परीक्षा सुरळीत घेण्यासोबत दररोज कस्टोडीयन करुन तालुक्याच्या ठिकाणावरुन वेळेवर प्रश्न पत्रिका आणने, परीक्षा संपेपर्यंत त्यांचा हिशोब ठेवणे, परीक्षा संपल्यावर सर्व उत्तरपत्रिका व उर्वरित प्रश्न पत्रिका परत कस्टोडीयन पोहचविणे, हजर गैरहजर विद्यार्थ्यांचा हिशोब देणे ही जवाबदारी पार पाडावी लागत होती. परंतु आता प्रत्येक पेपरला अतिरिक्त केंद्र संचालक बदलत असल्यामुळे त्याची जबाबदारी तेवढीच असली तरी त्यांची कामे कमी झाली आहेत. प्रश्न पत्रिका आणने व उत्तरपत्रिका पोहोचवून देणे या दोन महत्वाच्या जवाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. प्रश्न पत्रिका फोडून त्यातील पॉकीटामध्ये किती प्रश्न पत्रिका आहेत याची जवाबदारी आता अतिरिक्त केंद्र संचालकाची राहणार नाही. अतिरिक्त केंद्र संचालकााला आता कस्टोडीयनच्या आदेशानुसार आज एका केंद्रावर तर उद्या दुसºया परीक्षा केंद्रावर आपले कर्तव्य बजावावे लागणार आहे. प्रत्येक पेपरला नवीन नवीन अतिरिक्त केंद्र संचालक प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियुक्त केला जाणार आहे.
पर्यवेक्षकाचे मानधन केंद्र संचालकांना
परीक्षा केंद्र चालविण्यासाठी बोर्डाकडून प्रत्येक केंद्रावरील केंद्र संचालकाचा पुरेसा निधी खर्च करण्यासाठी दिला जातो. यामध्ये दररोज प्रत्येक पेपरला प्रत्येक पर्यवेक्षकाला कामाचा मोबदला म्हणून २५ रुपये प्रमाणे मानधन देण्याची तरतूद आहे. ते मानधन पेपर संपल्यावर त्याच दिवशी केंद्र संचालकाने पर्यवेक्षकास देणे आवश्यक असते. मात्र मागील काही वर्षांपासून बहुतेक केंद्रसंचालक पर्यवेक्षकांना मानधन देत नसल्याची माहिती आहे. एकीकडे कामाचा व्याप वाढला असून त्यातुलनेत दिले जाणारे २५ रुपये मानधन फार कमी असून त्यात वाढ करण्याची शिक्षकांची मागणी आहे.
पर्यवेक्षकाची जवाबदारी वाढली
परीक्षा केंद्रावर प्रत्येक वर्ग खोलीमध्ये २५ ते ३० विद्यार्थ्यामागे एक पर्यवेक्षक म्हणून शाळेतील शिक्षक नेमण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्तपत्रिका वाटप करने त्याच्या उत्तर पत्रिकावर बारकोड स्टीकर लावणे. परीक्षेत विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक व बारकोड स्टीकर नं. फार्मवर नोंद करने, उपस्थित, अनुपस्थितचा हिशोब ठेवणे, अतिरिक्त केंद्र संचालकाने आणून दिलेली प्रश्न पत्रिकेचे पॉकीट स्वीकारुन त्या पॉकीटवर दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी व बैठक क्रमांक लिहायला लावणे. त्यांच्यासमोर मुख्य पॉकीट फोडून पुन्हा आतील पॉकीटावर विद्यार्थ्यांची सही व रोल नं. नोंद करने नंतर प्रश्न पत्रिका बाहेर काढणे. त्या मोजने नंतर वाटप करणे, पॉकीटावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती कारेटोकपणे प्रश्न पत्रिकांचा शेवटपर्यंत हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेणे, आदी कामे करावी लागणार आहे.
पर्यवेक्षक जबाबदार
वर्गात एखादा गैरहजर असल्यास किंवा विद्यार्थी कॉपी करताना बाहेरील व्यक्तीला आढळल्यास त्यासाठीही पर्यवेक्षकास सर्वस्वी जबाबदार ठरविण्यात येईल. ही परिस्थिती बघता आता शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास मागे पुढे पाहणार आहेत.त्यामुळे दररोज पर्यवेक्षक नियुक्त करण्यासाठी केंद्र संचालकाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Additional Center Director to change every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा