आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 08:54 PM2019-04-23T20:54:07+5:302019-04-23T20:55:33+5:30
आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील. त्यामुळे समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारु शकते आणि तेव्हाच आपल्याला वाटेल की आपला समाज हा इतर समाजाच्या बरोबरीने विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. याकरिता आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम भागी (चिचगड) येथे आदर्श आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.२१) आयोजित आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेत कोरेटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी हलबा हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्रावण राणा, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत दुधनाग, गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मुख्य अभियंता प्रकाश घरत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माजी सभापती देवराज वडगाये, आमगावचे गटशिक्षण अधिकारी वाय.सी.भोयर, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, भागीचे सरपंच धनराज कोरोंडे, आश्रमशाळा संचालक जितेंद्र नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय पुराम यांनी, सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज असून यात वर-वधू कुटुबीयांच्या वेळ व पैशांची बचत होते असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल भोयर यांनी मांडले.
संचालन सहायक शिक्षक भागवत भोयर व विलास राऊत यांनी केले. आभार सहायक शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी मानले.
या विवाह सोहळ्यासाठी समितीचे उपाध्यक्ष युवराज कोल्हारे, कृष्णा गवाड, नूरचंद नाईक, सचिव मधुकर कुरसुंगे, सहसचिव कोषाध्यक्ष ओमराज राऊत, सहकोषाध्यक्ष जयपाल कोसरे, संघटक शिवकुमार राऊत, प्रेमलाल कोरोंडे, सुरेश वारई, अरविंद कोरोंडे, राधेश्याम राऊत, शामराव गावड, अर्जुन भोयर, उमेश धानगाये यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. या सोहळ््याला आदिवासी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि परिसरातील समाजातील बहुसंख्य महिला, पुरुष व युवक व वºहाडी प्रामुख्याने उपस्थित होते.
१० जोडप्यांचे ‘शुभमंगल’
आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने ग्राम भागी येथे आयोजीत आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ््यात १० जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. सोहळ््यात समाजबांधव व वºहाडी व पाहुणे परिणयबद्ध नव जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.