आदिवासी गोवारी समाजाचे गडकरींना निवेदन
By admin | Published: September 8, 2016 12:29 AM2016-09-08T00:29:53+5:302016-09-08T00:29:53+5:30
गोंडगोवारी या चुकीच्या शब्दप्रयोगात स्वल्पविराम घालण्यात यावे, यासाठी गोंदियासह इतर आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी
गोंदिया : गोंडगोवारी या चुकीच्या शब्दप्रयोगात स्वल्पविराम घालण्यात यावे, यासाठी गोंदियासह इतर आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गडकरी यांनी संघटनेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनानुसार, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेत आणण्यात विदर्भातील गोवारी समाजाची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे गोवारी बांधवांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. गोंडगोवारी शब्दात स्वल्पविराम घालण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर टी-पॉर्इंटवर ११४ गोवारी बांधवांनी आपले प्राण पणाला लावले.
आदिवासी गोवारी जमातीच्या न्यायासाठी गोवारी नेते स्व. सुधाकरराव गजबे शेवटच्या श्वासापर्यंत लढले. आता भाजप सरकारने गोवारी बांधवांची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावे, अशी मागणी गडकरी यांना करण्यात आली. यावर गोवारी समाजबांधवांची समस्या मार्गी लागेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष माधव चचाने, केंद्रीय संघटक गुलाब नेवारे, गोंदिया जिल्हाध्यक्ष का.ज. गजबे, प्रमिला गजबे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम कोहळे, नारायण कावरे, ना.धो. शेंद्रे, जनार्दन शहारे, मधुमती नेवारे, अविनाश गजबे, गिरधर गाते, डी.टी. चौधरी, युवराज नेवारे, रतिराम राऊत, मोतीराम नेवारे, शीला नेवारे, पुष्पा भोयर, दुर्गा नेवारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)