आदिवासी दुर्गम भागातील गरजू मुलांना वस्त्रदान

By admin | Published: November 22, 2015 01:58 AM2015-11-22T01:58:23+5:302015-11-22T01:58:23+5:30

बहुउद्देशिय विकास संस्थेवतीने तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

Adivasi wear clothes for needy children in remote areas | आदिवासी दुर्गम भागातील गरजू मुलांना वस्त्रदान

आदिवासी दुर्गम भागातील गरजू मुलांना वस्त्रदान

Next

सालेकसा : बहुउद्देशिय विकास संस्थेवतीने तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वस्त्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. संस्थेच्या युवकांनी ग्रामीण आदिवासी गावांमध्ये स्वत: जाऊन तेथील मुलांना त्यांच्या गरजेनुसार वस्त्र वाटप केले.
पहिल्या टप्यात संस्थेच्या युवकांनी तालुक्यातील भर्रीटोला, सुरजाटोला, रामाटोला, शिकारीटोला या गावातील मुलांना तसेच गावातील मोलमजुरी करणाऱ्या महिला-पुरुषांनासुद्धा वस्त्र वाटप केले. वस्त्र वाटप करणाऱ्यांमध्ये राहुल हटवार, विरेंद्र बागडे, अंकुश बागडे, विक्की बागडे, ओमप्रकाश नेवारे, यादवेंद्र उके, शैलेंद्र मेश्राम, मालती बागळे, वंदना मेश्राम यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Adivasi wear clothes for needy children in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.