कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:15+5:302021-04-28T04:31:15+5:30
जिल्हा प्रशासनाने एकूण २० खाजगी रुग्णालयांना कोविड उपचाराची मान्यता दिलेली आहे. या प्रत्येक रुग्णालयाकरिता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. ...
जिल्हा प्रशासनाने एकूण २० खाजगी रुग्णालयांना कोविड उपचाराची मान्यता दिलेली आहे. या प्रत्येक रुग्णालयाकरिता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. रुग्णालयाने रुग्णाचे बिल नियमाप्रमाणे आकारणी करावे,अधिकचे पैसे घेऊ नये याकरिता हे नोडल अधिकारी कार्यरत आहेत. नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यामुळे रुग्णालयाने अधिकचे बिल आकारणे या बाबीला चाप बसलेला आहे. गोंदिया जिल्ह्यामधील रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये याकरिता अदानी प्रकल्पाने पुरविलेल्या सीएसआर फंड मधून १३ केएल एवढी क्षमता असणाऱ्या ऑक्सिजन टाकीचे उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये मोठी सुविधा निर्माण होणार आहे. बऱ्याचदा रुग्णांना अनेक प्रकारची माहिती हवी असते, ही माहिती त्यांना सुलभतेने मिळावी याकरिता केटीएस रुग्णालयामध्ये एक मोठी स्क्रिन लावण्यात आलेली आहे. या स्क्रिनवर सर्व प्रकारची माहिती प्रदर्शित केली जात आहे. गोंदिया नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या कामी विशेष पुढाकार घेतलेला आहे. पूर्वी केटीएस रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांची बसण्याची गैरसोय व्हायची ही बाब जिल्हा
प्रशासनाने मुख्याधिकारी नगरपालिका यांना निर्देश देऊन तेथे एक मंडप उभारलेला आहे. बसण्याची सुविधा
निर्माण केलेली आहे. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याकरिता एक हक्काची जागा निर्माण झालेली
आहे.
......
बेडस् उपलब्धतेची माहिती ऑनलाईन
बऱ्याचदा कुठल्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहेत? कोणत्या रुग्णालयात जायचे? असा प्रश्न नागरिकांच्या
मनात निर्माण होतो. रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांना कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड उपलब्ध आहेत?
याची माहिती व्हावी याकरिता एनआयसीचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यांच्या मार्फत ऑनलाइन बेड मॅनेजमेंट
सिस्टीम निर्माण करून नागरिकांना ही माहिती गोंदिया एनआयसीवर उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे रुग्णांची मोठी सुविधा झालेली आहे.
..............
बचत गटाच्या माध्यमातून जेवणाचा पुरवठा
जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कोविड केअर सेंटर मध्ये दर्जेदार जेवण मिळावे याकरिता जिल्हा प्रशासन
आग्रही आहे. याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील माविमच्या बचत गटांना हे काम देण्यात आलेले असून,त्यांच्यामार्फत रुग्णांना दर्जेदार जेवण पुरविले
जाते. माविम बचत गटाच्या महिलांना हे काम दिल्यामुळे त्यांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे. शिवाय
रुग्णांना दर्जेदार जेवण मिळत आहे.
......
फ्रंटलाईन वर्कर्ससाठी १० टक्के बेड राखीव
कोविडचा मुकाबला करत असताना अनेकदा फ्रंटलाईन वर्कर शासकीय कर्मचारी हे कोविड पॉझिटिव्ह होतात. त्यांना बेड मिळावे याकरिता १० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याला सर्व रुग्णालयाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. कोणताही कोविड वारियर्स कोरोनाने बाधित झाल्यावर त्याला बेड मिळावा याकरिता वरिष्ठ अधिकारी स्वतः कसून प्रयत्न करतात. प्रसंगी रुग्णालयाला स्वतः फोन करून कोविड वॉरियर यांना बेड उपलब्ध करून देतात.