३.३० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी
By admin | Published: June 29, 2017 12:53 AM2017-06-29T00:53:04+5:302017-06-29T00:53:04+5:30
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह येथे निर्मित मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह येथे निर्मित मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३.३० कोटींच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू असून आता प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे सदर केंद्राचे चांगले दिवस लवकरच येणार असल्याचे समजते.
इटियाडोह मत्स्यबीज उत्पादन केंद्र केवळ गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर छत्तीसगड व विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तलावांमध्ये मासोळ्यांचे उत्पादन करण्यासाठी मत्स्यबीजांचा पुरवठा करतो. हे मत्स्यबीज केंद्र जिल्ह्यातीलच नव्हे तर अनेक जिल्ह्यातील मत्स्यमारीला निर्भरता प्रदान करते. मात्र त्याच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले नाही. विलंबाने का असेना परंतु शासनाचे कृषी पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग आता झोपेतून जागे झाले व या विभागाने सदर केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३.३० कोटींच्या खर्चाची योजना बनविली आहे. सदर मत्स्यबीज केंद्र सुरू होवून मोठा कालावधी लोटला. स्थानिक मत्स्यमारांच्या सहकार्याने एका संस्थेच्या माध्यमातून त्याला संचालित केले जाते. शासनाने राज्यातील चार मत्स्यबीज उत्पादन केंद्रांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इटियाडोहाचाही समावेश आहे.