२० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:07+5:30
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभुमीवर पुढील कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिले. यानुसार गोंदिया व आमगाव तालुक्यातील २० ग्रामपंचायतवर बुधवारी (दि.३१) प्रशासक नियुक्त करण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जोखीम या पार्श्वभुमीवर पुढील कोरोना संपेपर्यंत शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. जिल्ह्यातील ५४५ पैकी १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै ते डिसेंबर या कालावधीत असल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.
यातील ज्या ग्रामपंचायतीच्या कमिटीची मुदत ज्या दिवशी संपते त्याच दिवशी रात्री १२ वाजतानंतर प्रशासक बसविला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींवर ३१ जुलै रोजी प्रशासक बसविण्यात आले आहेत. ग्रामीण विकास विभागाने कोरोना संपेपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपत असल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसणार आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती असून यापैकी १९१ ग्रामपंचायतच्या पदाधिकारी सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जुलै महिन्यात २० ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे.
त्यापैकी १२ ग्रामपंचायतीवर प्रशासक अधिकारी म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात २१ ग्रामपंचायतीचा कालावधी, नोव्हेंबरमध्ये सहा ग्रामपंचायतीच्या कालावधी असे एकूण १९१ ग्रामपंचायतीचा कालावधी संपत आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक सद्या घेण्यात येणार नाही. परंतु कालावधी झाल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. गोंदिया तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत तिरोडा तालुक्यातील आहेत.
तिरोडा तालुक्यातील २०, आमगाव २२, सालेकसा ९, देवरी २९, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी १९, अर्जुनी-मोरगाव २९ अशा एकूण १९१ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही.त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. १९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून बसविण्यासाठी विस्तार अधिकाºयांची संख्याही मोठी असायला पाहिजे होती. परंतु गोंदिया जिल्ह्यात फक्त ३८ विस्तार अधिकारी असल्यामुळे एकाच विस्तार अधिकाºयावर पाच ते सहा ग्रामपंचायतीचा भार येणार आहे.