उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवाडा ८ जूनपर्यत
By admin | Published: June 1, 2017 01:10 AM2017-06-01T01:10:09+5:302017-06-01T01:10:09+5:30
उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवाडा जिल्हयात २५ मे ते ८ जून २०१७ या रोहीणी नक्षत्राच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्नत शेती समृध्द शेतकरी पंधरवाडा जिल्हयात २५ मे ते ८ जून २०१७ या रोहीणी नक्षत्राच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या उद्दीष्टपूर्तीसाठी चालू वर्षापासून खरीप व रब्बी हंगामात उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
२५ मे ते ८ जून २०१७ पर्यंत पंधरवाडा साजरा करावयचा आहे. कृषि सहाय्यकाच्या कार्य क्षेत्रातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचे नियोजन केले आहे. या पंधरवाडयातील कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात वार्ता फलक लावून कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचिवणे प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी सरासरी उत्पादकता व अनुवांशिक उत्पादन क्षमता यातील तफावत दूर करणे, शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रक्कमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पिक विमा योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेवून नैसिर्गक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळवून देणे, प्रमुख पिकांच्या उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने नविन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच पीक उत्पादनात स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे, आणी प्रति थेंब अधिक उत्पादन या संकल्पनाबाबत जनजागृती व मार्गदर्शन करणे, एकात्मिक शेती पध्दती, बहुवार पीक पध्दती, आंतर पिक पध्दतीबाबत जनजागृती करणे, कृषित संलग्न व कृषी पूरक व्यवसाय जसे पशूपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती, रेशीम उद्योग, आळींबी लागवड इत्यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ व आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता मार्गदर्शन करणे, उत्पादन वाढीकरीता नविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे.