‘उन्नत शेती’ तंत्रज्ञान प्रचार मोहीम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:42 PM2019-06-01T23:42:10+5:302019-06-01T23:43:24+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तवतीने मौजा धामणगाव येथे शनिवारी (दि.२५) ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ तंत्रज्ञान प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सरपंच छत्रपाल रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण टेंभरे, पोलीस पाटील सुखदेव गायधने तर मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी एल.एच.बंसोड, पशुधन विकास अधिकारी पटेल, प्रविण मुंढे उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सेंद्रीय शेती गट प्रमुख संतोष पारधी यांनी, सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपल्या शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केले. बन्सोड यांनी, कृषी विभागाच्या विविध योजना, बियाण्यांची निवड, निंबोळी अर्कचा वापर, खताचा समतोल वापर, जैविक किटकनाशकाचा वापर करणे, श्री पद्धतीने भाताची लागवड, जैविक किटकनाशकाचा वापर करणे, हिरवळीच्या खताचा वापर, कमी कालावधीत येणाºया धानाचा वापर करुन रब्बी हंगामात गहू, हरभरा, ,लाखोळी, जवस इ. पिकाची लागवड करणे विषयी मार्गदर्शन केले.
पटेल यांनी, जनावरांची निगा कशी राखावी, सुधारीत जातीच्या गाईचे संगोपन, पावसाळ्यात जनावरांना होणाºया आजारांची माहिती दिली. शहारे यांनी, बँकांमार्फत मिळणाºया विविध योजनांची माहिती दिली. प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी मुंढे यांनी सुध्दा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जी.ए.चौधरी यांनी मांडले. संचालन सुषमा शिवणकर यांनी केले. आभार राहुल सेंगर यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते.