उन्नत शेती-समृद्ध शेतकरी सभा
By admin | Published: June 6, 2017 01:04 AM2017-06-06T01:04:54+5:302017-06-06T01:04:54+5:30
उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचे शुभारंभ ...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन : शेतकऱ्यांनी केले अनुभव कथन
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम अंतर्गत कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचे शुभारंभ तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांच्या वतीने मांडवी येथे करण्यात आला. २५ मे ते ८ जून या पंधरवाड्यात शेतकऱ्यांना विविध विषयाचे धडे देऊन त्यांना अधिक उत्पन्न कमी खर्चात कसे घेता येईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचा खरा उद्देश धान पिकांची प्रत्यक्षात येणारी उत्पादकता व नैसर्गिक अनुवांशिकता यांच्यातील तफावत कमी करणे आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करुन देणे, पिक विमा योजनेत शेतकऱ्यांचे सहभाग वाढविणे, सन २०२२ पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांचे वैविष्यीकरण करुन उत्पन्न खर्च कमी करने, कृषी पूरक व्यवसाय शेतकऱ्याचे गटाद्वारे उत्पादन कंपन्यांशी संघटन मजबूत करुन व्यवसाय दृष्टीकोन वाढविणे, पारंपरिकेतून नवीन कृषी तंत्रज्ञानाची संजीवनी देऊन नफा वाढविणे यावर मार्गदर्शन केले. जमिनीची मशागत, माती परीक्षण, बियाणे निवड व प्रक्रिया, लागवड पद्धती, सेंद्रीय खताचा वापर खत व्यवसायातून खताचा वापर, किड व रोग नियंत्रण या बाबीसह विविध योजनेची माहिती देण्यात आली. कृषी तंत्रज्ञान व शेती विकास योजनाबाबद तालुका कृषी अधिकारी तिरोडा यांनी कृषी विभागाच्या प्रचलित योजनाच्या अंमलबजावणी अधिक सुटसुटीतपणा तसेच सुसूत्रता आणून योजना पारदर्शकरित्या अधिक प्रभावीपणे राबविणे हा भाग आहे. रोहणी नक्षत्रातील १५ दिवस उन्नत शेती समृद्ध शेतकरी हा तंत्रज्ञान प्रचार व प्रसार पंधरवाड्यात कृषी तंत्रज्ञान सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविणे आहे. या मोहिमेंतर्गत चालू वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजन घटक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. गाव स्तरावर मार्गदर्शनाकरिता त्या-त्या भागातील प्रगतशील शेतकरी, पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचे अनुभव कथनाचा लाभ इतर शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुन्ना दमाहे, उद्घाटन उपसरपंच रविशंकर मुटकुरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनेवाने, सचिव एस.पी. डोंगरे व इतर शेतकरी उपस्थित होते. संचालन व आभार आर.एम. रिनाईत यांनी केले. यशस्वितेकरिता पाणलोट सचिव व इतर शेतकऱ्यांनी सहकार्य केले.
गोंदिया : महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानाअंतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रसार व प्रचार पंधरवाड्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी उत्पन्न वाढीच्या सुत्राचा वापर करुन आपल्या शेतीच्या उत्पन्नात वाढ करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आर.जी. श्रृंगारे यांनी केले.
पिपरटोला (गिरोला) येथील ग्रामपंचायत कार्यालयात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या उपक्रमाची माहिती दासगाव येथील मंडळ कृषी अधिकारी पारधी यांनी दिली. ते म्हणाले, सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी तसेच आपल्या शेती लगतच्या शेतकऱ्यांना शेती उत्पन्नात वाढ करण्याच्या बाबी विचारुन योग्य सल्ला घेऊन शेती लागवड करावी. उत्पादन वाढीचे सूत्र, कृषी विभागांतर्गत शेती विकासाच्या विविध योजना आत्मसात करुन शेती उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी जोमात करावे.