अडीच लाख शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’ चा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:59 AM2019-02-14T00:59:48+5:302019-02-14T01:00:36+5:30

महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे.

Advantage of 'Kisan Samman' for 2.5 lakh farmers | अडीच लाख शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’ चा लाभ

अडीच लाख शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान’ चा लाभ

Next

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महसूल आणि कृषी विभागाची यंत्रणा मागील आठवडाभरापासून केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामाला लागले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी असून यापैकी अडीच लाख शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपर्यंत शेती असल्याची बाब कृषी व महसूल विभागाने याद्यांची छाननी केल्यानंतर पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. याचा लाभ शेतकºयांना तीन टप्प्यात दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी या योजनेतंर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठीच मागील आठवडाभरापासून महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला युध्दपातळीवर कामाला लावण्यात आले आहे.
यातंर्गत जिल्ह्यातील दोन्ही विभागाच्या यंत्रणांनी दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम मंगळवारी (दि.१२) पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत.
यापैकी अडीच लाख शेतकºयांकडे दोन हेक्टर शेती असल्याची बाब याद्यांच्या छाननीनंतर पुढे आली आहे. त्यामुळे ऐवढ्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.
महसूल आणि कृषी विभागाने तयार केलेल्या याद्यांचे प्रत्येक गाव स्तरावर वाचन केले जाणार आहे. त्यानंतर कृषी सहाय्यक यादीनुसार संबंधित गावातील शेतकºयांच्या कुटुंबांना भेटी देऊन नावांची खातरजमा करणार आहेत. त्यानंतर ही यादी महाआॅनलाईनवर अपलोड करुन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शेतकºयांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

मर्यादा वाढल्यास संख्येत वाढ
प्रधानमंत्री किसास सन्मान योजनेचा लाभ केवळ २ हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक क्षेत्र असणाºया शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकºयांची ही नाराजी ओढावून घेणे विद्यमान सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारकडून हेक्टरच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
आठवडाभरात होणार चित्र स्पष्ट
२ हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ऐवढ्या कमी कालावधीत याद्या तयार करण्याचे काम प्रथमच झाल्याचे प्रशासकीय वर्तुळात बोललते आहे. याद्या तयार करुन त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी संलग्न करण्याचे काम सुध्दा येत्या आठवडाभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता मार्च महिन्यात जमा होईल यात कुठलही शंका नाही.

Web Title: Advantage of 'Kisan Samman' for 2.5 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी