प्रवासी निवाऱ्यांला जाहिरातींचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:46 PM2018-03-04T21:46:02+5:302018-03-04T21:46:02+5:30
स्थानिक ठिकाणासह अनेक परिसरात प्रवासी निवारे आहेत. या निवाऱ्यांमध्ये प्रवाशांना बसायला पुरेसी जागा नसते, पण जाहिरातींनी निवारे पूर्णत: झाकून टाकले जात आहे.
ऑनलाईन लोकमत
बाराभाटी : स्थानिक ठिकाणासह अनेक परिसरात प्रवासी निवारे आहेत. या निवाऱ्यांमध्ये प्रवाशांना बसायला पुरेसी जागा नसते, पण जाहिरातींनी निवारे पूर्णत: झाकून टाकले जात आहे. अनेक जाहिरातींच्या तिढ्यांनी प्रवासी निवारे सजल्याचे चित्र सर्वत्र आहे.
ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अनेक प्रकारच्या जाहिरातींचे स्टीकर्स, पोस्टर्स, बॅनर्स दिसतात. धानाची प्रजाती, बी-बियाणे, औषध फवारणी, सारथी, अंकुर, एचएमटी, सोनाली, मोना, राणी तसेच धार्मिक कार्यक्रम, काला, महाप्रसाद, जत्रा, महोत्सव व प्रबोधन कार्यक्रमांच्या प्रचाराचे बॅनर्स, पोस्टर्स लावून प्रवासी निवारा झाकला जातो.
आता तर चक्क संत साहित्याच्या संमेलनाच्या मोठ्या होर्डीगने अर्धा प्रवासी निवारा झाकला आहे. हा प्रवासी निवारा बाराभाटी-गोठणगाव रोडवरील असून प्रवासी थांबले की वाहन दिसायचे कामच नाही असा प्रचार-प्रसार झाल्याचे वास्तव चित्र आहे.
प्रवासी निवाºयांची अशी अवस्था असेल तर प्रवासी कसे थांबणार. अशा प्रवाशी निवाºयांमध्ये वाहनांची वाट कशी बघावी, असा प्रश्न उभा होत आहे. प्रवासी निवाऱ्यांचा दारांची जागा सोडली तर चक्क दोन बॅनर्सने संपूर्ण निवारा दाबला गेला आहे. एवढे मोठे बॅनर लावून निवाºयाची शोभा बंद केल्याचे चित्र दिसत आहे.
तसेच चक्क चष्मा आॅप्टीकल्स, विनाआपरेशन शर्तीया इलाज, शिफा दवाखाना, गुप्त रोगी मिले, किसान गर्जना, क्रीडा स्पर्धा पोस्टर, महाप्रसाद पाम्पलेट, हार्दिक शुभेच्छा, नाटक, तमाशा व खासगी व्यवसायांच्या प्रत्येक प्रकारची जाहीरात या निवाºयांवर असते. याचा प्रवाशांचा मोठाच त्रास होतो.
शहरातील निवाऱ्यांमध्ये विनापरवानगीने दुकानदारी थाटण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना बसायला जागा राहत नाही. अशीच पध्दत आता ग्रामीण भागातील नागरिकांनी धरली आहे. अनेक व्यवसायांमुळे प्रवासी निवाऱ्याच्या बाहेर बसून वाट पाहतात व प्रवास करतात.
प्रवासी निवाऱ्यांची व्यथा केव्हा दूर होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. हा प्रकार जेव्हा बंद होईल तेव्हाच प्रवासी निवारा सुंदर व स्वच्छ दिसतील.
प्रवासी निवाºयांना जाहिरातींपासून वाचवा, अशी मागणी परिसरातील येरंडी, बाराभाटी, ब्राम्हणटोला, सुरगाव, देवलगाव, सुकळी, बोळदे, कवठा, डोंगरवार येथील नागरिकांनी केली आहे.
भिंतीसुद्धा फुटल्या
प्रवासी निवारे आयडीया, रिलायन्स, वोडाफोन, एयरटेल आदी कंपन्यांच्या नावांनी रंगविलेले दिसतात. अनेक ठिकाणी प्रेमवीर, तरूण-तरूणींची नावे दिसतात. ती कोळशांनी रंगविलेली असतात. काही प्रवासी निवारे छताविनाच आहेत. काही ठिकाणी भिंती फुटलेल्या आहेत. काही निवारे पानटपरी व चहादुकानांनी व्यापलेले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये घाणीने साम्राज्य पसरलेले आहे. प्रवासी निवारा परिसरात ओला कचरा आहे. त्यात सरपटणारे प्राणी जागा धरत आहेत. या सर्व बाबींचा प्रवाशांना त्रास होत आहे.