ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:49 AM2018-02-01T00:49:52+5:302018-02-01T00:50:08+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन तथा इतवारी येथील मोठ्या लाईनच्या कामामुळे २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापर्यंत तसेच २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ४ वाजतापर्यंत...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-इतवारी दरम्यान छिंदवाडा आमान परवर्तन तथा इतवारी येथील मोठ्या लाईनच्या कामामुळे २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजतापर्यंत तसेच २ फेब्रुवारीच्या रात्री १२ ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी ४ वाजतापर्यंत तब्बल ४४ तासांचा नानइंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द तर अनेक गंतव्य स्थानकाच्या आधीच समाप्त होतील. तर काही गाड्यांच्या मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे.
यात नागपूर-रामटेक (५८८१०), रामटेक-इतवारी-रामटेक पॅसेंजर (५८८१४, ५८८०९, ५८८१२, ५८८१३,५८८११) या गाड्या २ व ३ फेब्रुवारी रोजी रद्द राहतील. रामटेक-इतवारी (५८८११) पॅसेंजर १ फेब्रुवारीला इतवारी स्थानकात समाप्त होईल. गोंदिया-इतवारी-गोंदिया (६८७१३, ६८७४३, ६८७१५) या गाड्या २ व ३ फेब्रुवारीला कामठी स्थानकात समाप्त होतील. तर (६८७१४, ६८७४४,६८७१६) या गाड्या २ व ३ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता कामठीवरून प्रस्थान करतील.
टाटा-इतवारी (५८१११) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला दुर्गमध्ये समाप्त होईल. तर इतवारी-टाटा (५८११२) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला इतवारी स्थानकातून न सुटता ३ व ४ फेब्रुवारीला दुर्गवरून वेळेवर प्रस्थान करेल. तिरोडी-इतवारी (५८८१६) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला तुमसर रोड स्थानकात समाप्त तर इतवारी-तिरोडी (५८८१५) पॅसेंजर २ व ३ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता तुमसर रोडवरून प्रस्थान करेल.
रायपूर-इतवारी (५८२०५) पॅसेंजर १, २ व ३ फेब्रुवारीला तुमसर रोड स्थानकात समाप्त होईल. तर इतवारी-रायपूर (५८२०६) पॅसेंजर २, ३ व ४ फेब्रुवारीला इतवारीवरून न सुटता तुमसर रोडवरून प्रस्थान करेल.
बिलासपूर-नागपूर (१८२३९) बिलासपूर-नागपूर शिवनाथ एक्स्प्रेस २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियात समाप्त होईल. नागपूर-बिलासपूर (१२८५६) इंटरसिटी २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियावरून निर्धारित वेळेवर सुटेल. बिलासपूर-नागपूर ((१२८५५) इंटरसिटी १, २ व ३ फेब्रुवारीला गोंदियात समाप्त होईल. नागपूर-बिलासपूर (१८२४०) शिवनाथ एक्स्प्रेस १, २ व ३ फेब्रुवारीला नागपूरऐवजी गोंदियावरून २, ३ व ४ फेब्रुवारीला निर्धारित वेळेवर सुटेल.
शालीमार एक्स्प्रेस (१८०३०/१८०२९) व महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०४०/११०३९) २ व ३ फेब्रुवारीला इतवारीऐवजी नागपूर-कलमना सरळ मार्गाने धावेल म्हणजे इतवारीवरून जाणार नाही.