ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:36 PM2018-07-08T22:36:18+5:302018-07-08T22:37:19+5:30

दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळातील कोतरलिया व जामगाव स्थानकांच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसºया रेल्वे लाईन परियोजनेशी जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.

Affecting the block due to rail travel | ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित

Next
ठळक मुद्देकाही गाड्या रद्द तर काहींचा विस्तार : तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेला यार्डशी जोडण्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दपूम रेल्वेच्या बिलासपूर मंडळातील कोतरलिया व जामगाव स्थानकांच्या यार्डाचे आधुनिकीकरण व तिसऱ्या रेल्वे लाईन परियोजनेशी जोडण्यासाठी नविनीकरणाचे काम १८ ते २७ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.
सदर १० दिवसांपर्यंत (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर, झारसुगडा-बिलासपूर-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. सदर कालावधीत या गाडीचे परिचारलन बिलासपूर-गोंदिया-बिलासपूर दरम्यान निर्धारित वेळेवर राहील. तर (५८१११/५८११२) टाटानगर-इतवारी-टाटानगर पॅसेंजर, झारसुगडा-इतवारी-झारसुगडा दरम्यान रद्द राहील. सदर कालावधीत या गाडीचे परिचालन टाटानगर-झारसुगडा-टाटानगर दरम्यान निर्धारित वेळेवर राहील. रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांच्या सुविधेसाठी १८ ते २७ जुलैपर्यंत एकूण १० दिवस गाडी (१२८३४) हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा व रायगड दरम्यान पॅसेंजर बनवून चालविण्यात येणार आहे.
आज महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द
मध्य रेल्वे अंतर्गत जळगाव-भुसावळ मार्गावर अपग्रेडेशनचे कार्य करण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलै रोजी कोल्हापूरवरून निघणारी गाडी (११०३९) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द असल्यामुळे ही गाडी ८ जुलै रोजी गोंदियाला पोहोचणार नाही. त्यामुळे ९ जुलै रोजी गोंदिया स्थानकातून सुटणारी (११०४०) महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
सिकंदराबाद-दरभंगा गाडीचा विस्तार
प्रवाशांच्या विशेष सुविधेसाठी सिकंदराबाद व दरभंगा दरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या परिचालनात विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी सिकंदराबाबवरून ०७००७ या क्रमांकाने ३१ जुलैपर्यंत चालणार होती. आता या विशेष गाडीच्या परिचालनात ३० आॅक्टोबर पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तसेच विपरित दिशेतही दरभंगावरून (०७००८) ३१ जुलैपर्यंत धावणाºया विशेष गाडीच्या ३० आॅक्टोबरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

Web Title: Affecting the block due to rail travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे