ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास होणार प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:18 AM2018-07-29T00:18:08+5:302018-07-29T00:19:35+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत उरकुरा-दाधापारा सेक्शन दरम्यान २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट २०१८ रोजी (प्रत्येक रविवार) अनुक्रमे अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक अपग्रेडेशन कार्य करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत उरकुरा-दाधापारा सेक्शन दरम्यान २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट २०१८ रोजी (प्रत्येक रविवार) अनुक्रमे अप लाईन, मिडल लाईन व डाऊन लाईनवर बहुविभागीय आवश्यक अपग्रेडेशन कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे.
यात अप व मिडल लाईनवर २९ जुलै तसेच ५, १२ व २६ आॅगस्ट रोजी गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. गाडी (५८२०५) रायपूर-इतवारी पॅसेंजर प्रत्येक रविवारी रद्द राहील.त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रत्येक सोमवारी (५८२०६) इतवारी-रायपूर पॅसेंजर रद्द राहील. तर डाऊन लाईनवर करण्यात येणाºया आवश्यक कामासाठी रविवारी, १९ आॅगस्ट रोजी गाडी (५८११७/५८११८) झारसुगडा-गोंदिया-झारसुगडा पॅसेंजर बिलासपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. तसेच अप, मिडल व डाऊन लाईनवर आवश्यक कामासाठी २९ जुलै तसेच ५, १२, १९ व २६ आॅगस्ट रोजी गाडी (१८२३८) अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस रायपूर-बिलासपूर दरम्यान पॅसेंजर बनून धावेल.
रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे अपग्रेडेशनच्या सदर कार्यक्रमात परिवर्तनसुद्धा केले जाऊ शकते, असे कळविण्यात आले आहे.