अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा

By Admin | Published: August 6, 2016 01:23 AM2016-08-06T01:23:47+5:302016-08-06T01:23:47+5:30

आपल्या शेजारील, परिसरातील भंगार व्यवसाय करणारे हे आपलीच मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी

After all, it will be the way it will be empty | अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा

अखेर ‘तो’ मार्ग होणार मोकळा

googlenewsNext

अड्याळ येथील भंगाराचे प्रकरण : पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई
अड्याळ : आपल्या शेजारील, परिसरातील भंगार व्यवसाय करणारे हे आपलीच मनमानी करून मिळेल त्या ठिकाणी ती भंगार ठेवणे आणि कोणी जर समजदारी ने बोलले तर त्यालाही न जुमानने, गेली सहा ते आठ वर्षापासून ज्या ग्रामस्थांनी ही कबाडी, हा व्यवसाय येथून हटविण्यात यावे, म्हणून कोर्टातही धाव घेतली होती. त्यानंतरही हा व्यवसाय व त्यामुळे येथील ग्रामस्थांना त्रास होतच राहिला. ग्रामस्थांचा विषय यावेळी ग्रामपंचायतीने गंभीरतेने घेतल्याचे जाणवते. त्यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी मोकळा होणार आहे.
वृत्तपत्रात माहिती प्रकाशीत होताच भंगार व्यवसाय करणारे रामदास दयाराम खोब्रागडे यांना ८ आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील जंगम मालमत्ता उचलवायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ अन्वये संपूर्ण साहित्य पोलीस संरक्षणात उचल करून जप्त करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामपंचायतीने सदर व्यवसायीकाला दिल्याची माहिती आहे.अड्याळ ग्रामपंचायतीने कागदावर आक्रमक भूमिका निभावली असली तरी त्याची अंमलबजावणी खरच होणार यात ही ग्रामस्थांना शंका असल्याची चर्चा आहे. कारण या आधी सुद्धा असे घडले. त्यामुळे शंका असल्याचे बोलले जात असले तरी यावेळी असे होणार नसल्याचेही ग्रामपंचायत कडून बोलल्या जात आहे.
माहितीप्रमाणे वॉर्ड क्र. ३ येथील सार्वजनिक रस्त्यावर जलनिसारण गटारेवर व खुल्या जागेवर कबाडीचे निरूपयोगी साहित्य जंगम मालमत्ता ठेवले जाते त्यामुळे वाहतुकीस व येणाऱ्या जाणाऱ्यास त्यामुळे अडथळा ही होतो.
निरूपयोगी साहित्य रस्त्यावर व नालीवर ठेवल्यामुळे पावसाचे पाणी साहित्यात साचल्यामुळे रोगांची लागण होऊ शकते. त्यामुळे व्यवसायीकाने तात्काळ सात आॅगस्टपर्यंत रस्त्यावरील, नालीवरील व खुल्या जागेवरील निरूपयोगी साहित्य व जंगम मालमत्ता उचल करावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ चाही उल्लेख करून खोब्रागडे यांना ग्रामपंचायतीने लेखी पत्रही पाठविले आहे. सहा ते आठ वर्षांपासून जे सहजासहजी हटले नाही ते एका ग्रामपंचायतीच्या अधिनियमाला पेलणार का,? असा प्रश्न उपस्थित होतो. याकडे अड्याळवासियांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या कारवाहीकडे लागून आहे. (वार्ताहर)

Web Title: After all, it will be the way it will be empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.